इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींचा पारा चढला; ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप

INDIA Alliance Press Conference : इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जीं ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आऱोप केले आहेत.

News Photo   2026 09 30T163554.351

INDIA Alliance Press Conference

इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर (India Alliance) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार, भाजप आणि निवडणुक आयोगावर जोरदार आरोप केले. वोट चोरीच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषदेला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणुक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. बिहारमधील कथित वोट चोरीमुळं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना फटका बसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मध्यप्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधेही अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचा आरोप करत या मुद्यावर आपण यापुर्वी निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडं दाद मागितल्याचं त्यांनी सांगितलं.

इंडिया आघाडीचा मोठा निर्णय! 6 ऑक्टोबरला निवडणुक आयोगाविरोधात मोर्चा

निवडणुक प्रक्रियेवरील आरोप गंभीर असुन आता लोकशाही आणि नागरिकांचा मतदानाचा अधिकार वाचवण्याची वेळ आली आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या वक्तव्यानंतर निवडणुक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीची भुमिका आणखी आक्रमक झाल्याचं दिसुन आलं आहे. दरम्यान, निवडणुक प्रक्रियेबाबत विरोधकांकडुन करण्यात येणारे आरोप निवडणुक आयोगानं यापुर्वी फेटाळले आहेत.

दरम्यान, इंडिया आघाडीनं निवडणुक आयोगाविरोधातील आंदोलनाचं नियोजनही जाहीर केलं आहे. 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जिल्हा पातळीवर सेव डेमोक्रसी मोर्चे आणि निदर्शनं करण्यात येणार आहेत. त्यानंतर 6 ऑक्टोबरला विरोधी पक्षांचे खासदार दिल्लीत निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. या आंदोलनाच्या माध्यमातुन निवडणुक प्रक्रिया आणि मतदार याद्यांबाबतचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

Exit mobile version