Video : ‘ममता बॅनर्जी नव्हे ती तर मुमताज खान; भगवा रंग बघितला की भडकते’

Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]

Video : 'ममता बॅनर्जी नव्हे ती तर मुमताज खान; भगवा रंग बघितला की भडकते'

Letsupp Image 2024 01 13T134823.864

Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग पाहताच राग येतो असे म्हणत बंगालमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले आणि अत्याचार यामागे खुद्द मुख्यमंत्र्यांचा हात आहे, असा गंभीर आरोपही दास यांनी केला आहे. या आरोपामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंदू जेव्हा रामनवमीची मिरवणूक काढतात तेव्हा त्यांच्यावर हल्ले होतात. दुर्गामातेच्या विधी आणि पंडितांचे आयोजन केले जाते तेव्हा त्याला विरोध होतो. अशाप्रकारे जे काही धार्मिक कार्यक्रम होतात, त्यांना विरोध करून हल्ले केले जातात. हे सर्व बंगाल सरकारमुळे घडते आणि खुद्द मुख्यमंत्रीच याच्या विरोधात आहेत. त्यामुळे ममता यांना देण्यात आलेले मुमताज खान हे नाव एकदम तंतोतंत आहे.

Ram Mandir चं उद्घाटन अन् गर्भवती मातांची अनोखी मागणी; अयोध्येतील अजब प्रकार

हल्ले होण्यामागे बंगाल सरकार

दास पुढे बोलताना म्हणाले की, हिंदू जेव्हा रामनवमीची मिरवणूक काढतात तेव्हा त्यांच्यावर हल्ले होतात. दुर्गामातेच्या विधी आणि पंडितांचे आयोजन केले जाते तेव्हा त्याला विरोध होतो. त्यामुळे अशाप्रकारे जे काही धार्मिक कार्यक्रम होतात, त्यांना विरोध करून हल्ले केले जातात. हे सर्व बंगाल सरकारमुळे घडत असून, हिंदूंचे सण साजरे करण्यास स्वतः मुख्यमंत्री बॅनर्जींचाच विरोध आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये साधू आणि त्यांचे भगवे कपडे बघितल्यानंतर त्यांना प्रचंड राग येतो.

Ayodhya Ram Mandir : जाणून घ्या अयोध्या नगरीचा इतिहास : LetsUpp Marathi

Exit mobile version