Download App

Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याचे हालचालींना वेग आला आहे. आज राज्यात मोठी राजकीय घडामोड (Manipur Politics) घडल्याने

Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याचे हालचालींना वेग आला आहे. आज राज्यात मोठी राजकीय घडामोड (Manipur Politics) घडल्याने मणिपूरमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार (NDA Government) स्थापन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज (28 मे) एनडीएचे 10 आमदारांनी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला (Ajay Bhalla) यांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे लवकरच मणिपूरमध्ये सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ए़नडीएकडून करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजभवनात पोहोचलेल्या दहा आमदारांमध्ये भाजपचे युमनम राधेश्याम सिंह, थोक्चोम राधेश्याम सिंह, लौरेम्बम रामेश्वर मेइतेई, थांगजम अरुणकुमार, ख. रघुमणी सिंह, कोंगखाम रॉबिंद्रो सिंह आणि पोनम ब्रोजेन सिंह, एनपीपीचे शेख नुरुल हसन आणि जंगहेमलिउंग आणि अपक्ष आमदार सपम निशिकांत यांचा समावेश आहे. या आमदारांपैकी नऊ आमदार मेइतेई-बहुल खोऱ्यातील आहेत, तर पनमेई नागा आहेत.

थोक्चोम राधेश्याम सिंह यांनी सांगितले की आम्ही जाऊन 44 आमदारांचे मत सांगितले. परिस्थिती आणि जनतेचा दबाव पाहता, आम्ही राज्यपालांना सांगितले की सरकार स्थापन करण्याची हीच योग्य वेळ आहे. राष्ट्रपती राजवट ही एक आणीबाणीची पायरी आहे आणि ती शेवटचा पर्याय असावा. जर नवीन सरकार अपयशी ठरले तर तुम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने राष्ट्रपती राजवट लागू करू शकता.

अजितदादांचा मोठा निर्णय, चौंडी विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मान्यता

आम्ही राज्यपालांना एक कागदपत्र देखील दिले आहे, ज्यावर आम्ही सर्वांनी स्वाक्षरी केली आहे. मणिपूरमधील सर्व एनडीए आमदार सरकार स्थापन करण्यास खूप उत्सुक आहेत. असं माध्यमांशी बोलताना आमदार थोक्चोम राधेश्याम सिंह म्हणाले.

follow us