Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Manipur Violence : देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर मागील सहा महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अजूनही येथील हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकार येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर आता सरकारने मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फोटो आणि व्हिडिओंना आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटवर बंदी वाढविण्यात आली आहे.  काही दिवसांंत […]

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर मागील सहा महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अजूनही येथील हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकार येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर आता सरकारने मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फोटो आणि व्हिडिओंना आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटवर बंदी वाढविण्यात आली आहे.  काही दिवसांंत ही बंदी मागे घेण्यात येईल, असे आश्वासन मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

मणिपुरात हिंसाचार चिघळत चालल्याने सरकारने राज्यात इंटरनेट बंद केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवरील बंदी उठविण्यात आली होती. परंतु, 26 सप्टेंबरला पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर प्रत्येक पाच दिवसांनी ही बंदी वाढविण्यात येत आहे. सरकारने आता पुन्हा यामध्ये वाढ केली आहे. राज्यात अजूनही वातावरण पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही. हिंसेच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  वातावरण चिघळण्यात इंटरनेटची मोठी भूमिका असते. आक्षेपर्ह मेसेज, अफवा वेगाने पसरतात. हे प्रकार टाळण्यासाठी राज्यात इंटरनेट बंदी सातत्याने वाढविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मैतेई आणि आदिवासी कुकी समुदायांमध्ये या वर्षी मे महिन्यापासून हिंसक संघर्ष सुरू आहेत आणि राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. नुकतेच सोशल मीडियावर दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे, ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत.  अजूनही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.

LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

Exit mobile version