Download App

मनीष सिसोदियांची होळी तिहार जेलमध्येच…!

नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi)माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे (aap)नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांना दिल्लीतील अबकारी धोरण (Excise Policy in Delhi)प्रकरणात दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज सोमवारी (दि.6) पुन्हा एकदा राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांची 20 मार्चपर्यंत तिहार जेलमध्ये (Tihar Jail)रवानगी केलीय.

यादरम्यान सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं की, या परिस्थितीत आम्ही आणखी सीबीआय कोठडीची मागणी करत नाही, मात्र पुढील 15 दिवसांत आम्ही ती मागू शकतो. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

ठाकरे, वायकरांना हिशेब द्यावाच लागणार; सोमय्यांनी थेट पुरावेच मांडले, बडे अधिकारीही गोत्यात

सीबीआयनं मीडियात सुरू असलेल्या बातम्यांवर आक्षेप घेत, तुम्ही या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचं म्हटलंय. एकीकडं हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना दुसरीकडं सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचं बोललं जातंय. सिसोदिया यांना तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर व्हायचं आहे का? अशी विचारणाही न्यायालयानं केलीय.

सिसोदियांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मनीष सिसोदिया यांनी भगवत गीता, डायरी, पेन देण्याची मागणी केलीय. त्याचबरोबर सिसोदियांना औषधं घेऊन जाण्यास परवानगी दिलीय.

Tags

follow us