ठाकरे, वायकरांना हिशेब द्यावाच लागणार; सोमय्यांनी थेट पुरावेच मांडले, बडे अधिकारीही गोत्यात

ठाकरे, वायकरांना हिशेब द्यावाच लागणार; सोमय्यांनी थेट पुरावेच मांडले, बडे अधिकारीही गोत्यात

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला होता. त्याचवेळी सोमय्यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर (Manisha Waykar) यांच्यावर 19 बंगल्याचा आरोप केला होता. या सर्व गोष्टीसमोर आल्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारनं तेथील रेकॉर्ड, पुरावे कशा पद्धतीनं नष्ट केल्याचे पुरावे रेवदंडा पोलीस (Police)ठाण्यात दिल्याचं सांगून उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांना हिशेब द्यावाच लागणार असंही आपल्या ट्वीटद्वारे म्हटलंय.

किरीट सोमय्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी, मनीषा वायकर यांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात मालमत्ता खरेदी करताना घोटाळा आणि फसवणूक केल्याचा आरोप केलाय. त्या माहितीच्या आधारावर आपण शासकीय कार्यालय तसेच अलिबाग येथील जिल्हा परिषद रायगड व ग्रामपंचायत कोर्लई येथून विविध पुरावे जमा केले आहेत.

Sambhajinagar : लग्न मंडपातून नवरदेव पोहोचला औरंगाबादच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी

आपण गोळा केलेल्या कागदपत्रांवरून आणि विविध संबंधित व्यक्तींकडं चौकशी केल्यानंतर आढळलं की अन्वय मधुकर नाईक यांची मालमत्ता रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी सर्व मालमत्ता आणि त्यावर असलेली सर्व बांधकामं, विहिरी, झाडं आदींची खरेदी केली आणि त्याच्या विक्री करारनाम्याची दुरुस्तीनाम्याद्वारे मुरुड येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी केली.

या करारनाम्यातून अन् दुरुस्तीनाम्यातून असं दिसतंय की अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांच्यात झालेल्या व्यवहारात त्या मालमत्तेत असलेली बांधकामं/घरांचं मूल्यांकन केलं नव्हतं आणि त्या बांधकामाचं मुद्रांक शुल्क भरलं नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी ही बांधकामं/संरचना विक्री कारारनाम्यात लपवल्या आहेत. त्या संरचनांवर मुद्रांक शुल्क न भरून घोटाळा केलाय. सरकारची फसवणूक केलीय त्यामुळं मुद्रांक शुल्काच्या रूपात सरकारचं नुकसान झाल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राजकीय दबावापोटी आणि ग्रामपंचायत कोर्लई येथेही शिवसेनेची सत्ता असल्यामुळं घरपट्टी रद्द करण्याचा प्रयत्न केला. सर्व बांधकामं त्या जागेत उभी होती, पण त्या बांधकामांबद्दलची माहिती उघड होताच, बांधकामं पाडण्यात आल्याचंही आपल्या तक्रारीत म्हटलंय.

या घोटाळा करुन ठाकरेंनी शासनाचं नुकसान केलंय. आपण त्यासाठी आपण रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं तक्रार केली. प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंच्यातीच्या सर्व दोषी पदाधिकाऱ्यांवर आणि विद्यमान आणि माजी सरपंच, विद्यमान, माजी
ग्रामसेवक यांच्यासह मनीषा वायकर व रश्मी ठाकरेंवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली नाही किंवा गुन्हे नोंदवले नाहीत.

त्यामुळं रश्मी ठाकरे, मनीषा वायकर, विद्यमान व माजी सरपंच, विद्यमान व माजी ग्रामविकास अधिकारी कोर्लई ग्रामपंचायत, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube