Download App

विमानात नवजात बाळाला श्वसनाचा त्रास; मराठमोळा IAS अधिकारी 6 महिन्याच्या मुलासाठी ठरला देवदूत

दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो फ्लाइटमध्ये घडलेल्या एका थरारक प्रसंगात मराठमोळे IAS अधिकारी 6 महिन्यांच्या मुलासाठी देवदूत म्हणून आले. शनिवारी (30 सप्टेंबर) या अधिकाऱ्याने 6 महिन्याच्या मुलाचे प्राण वाचविले. उड्डाणाच्या सुमारे वीस मिनिटांनंतर, क्रूने मुलाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याचे सांगत विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. नितीन कुलकर्णी (Nitin Kulkarni) यांनी तातडीने धाव घेत संबंधित मुलाला मदत केली. (Marathi IAS officer Nitin Kulkarni saved the life of a 6-month-old boy in a Ranchi-Delhi IndiGo flight)

याबाबत अधिक माहिती अशी की, एक जोडपे रांचीहून आजारी मुलाला घेऊन दिल्ली एम्समध्ये जात होते. बाळाला जन्मापासून हृदयविकाराचा त्रास आहे, त्याच्यावर सध्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. अशात विमानात उड्डाणानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची अवस्था पाहून त्याची आई रडू लागली होती.

पंतप्रधान मोदी ‘विश्वगुरू’, पण खलिस्तानवाद्यांचा… ठाकरे गटाचा निशाणा

क्रूने तात्काळ लाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याचे सांगत विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्याचवेळी आयएएस अधिकारी डॉ. नितीन मदन कुलकर्णी आणि रांचीचे डॉ. मोझम्मील फिरोज हे देखील या विमानात प्रवास करत होते. कुलकर्णी हे सध्या झारखंडच्या राज्यपालांचे प्रधान सचिव आहेत. त्यांना वैद्यकीय अनुभवही आहे. तर डॉ. मोझम्मील फिरोज हे सदर हॉस्पिटल, रांची येथे कार्यरत आहेत.

Manipur : दोन विद्यार्थ्य्यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, आरोपींना फाशी द्या; CM यांची मागणी

या दोघांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून मुलावर उपचार सुरु केले आणि ऑक्सिजन दिला. इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळाल्यानंतर मुलाच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली. यावेळी त्यांनी सांगितले की पहिली 15-20 मिनिटे खूप महत्त्वाची आणि तणावपूर्ण होती. कारण इंजेक्शन आणि ऑक्सिजन दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीचा अचूक अंदाज लावणे कठीण होते. कालांतराने त्याची प्रकृती सामान्य झाली. फ्लाइटच्या केबिन क्रूनेही खूप मदत केली.

‘आम्ही मुलाला नवं आयुष्य मिळताना पाहिलं’

यानंतर सकाळी 9.25 वाजता विमान लँड झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने मुलाला ऑक्सिजन सपोर्ट दिले. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनीही दोन्ही डॉक्टरांचे आभार मानले आणि अभिनंदन केले. एका ६ महिन्यांच्या बाळाला फ्लाइटमध्ये नवे जीवन मिळाले, डॉक्टर हे देवाने पाठवलेले देवदूत आहेत, अशी भावना व्यक्त केली.

Tags

follow us