इंदूरनंतर आंध्रप्रदेशात मोठा अपघात, मंदिराला लागली भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल मंदिराला ही आग लागली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंदिरामध्ये रामनवमीच्या ऊत्सवासाठी मंडप घालण्यात आला होता. शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग लागली आहे. ही आग लगोलग सर्व मंडपभर पसरली आहे. आग लागल्यानंतर भाविकांना लगेचच बाहेर काढण्यात आले आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Fire breaks out at a temple in Duva village in West Godavari district during Rama Navami celebrations. No casualties reported. pic.twitter.com/IsHdVh2Tcd
— ANI (@ANI) March 30, 2023
यानंतर पोलिस व मंदिराचे अधिकारी हे लगेचच घटनास्थळी आले व त्यांनी बचावकार्य सुरु केले. सतर्कतेमुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही. परंतु काही लोकांना किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे. आगीमुळे किती नुकसान झाले आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.
Rahul Gandhi यांच्या बंगल्यात रूम्स किती ? ते किती वीज-पाणी बिल भरतात जाणून घ्या…
दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये देखील एक दुर्घटना घडली आहे. शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात असलेल्या विहीरीवरील छत खचल्याने 50 पेक्षा जास्त लोक या विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्या या लोकांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. घटना घडल्यानंतरही अग्निशम दल आणि अम्ब्यूलन्स वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे जसे जमेल तसे या लोकांना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत पाच लोकांना विहीरीतून बाहेर काढले गेले आहे.