महत्वाची बातमी! मे महिन्यात कसे असणार तापमान? पाहा हवामान विभागाचा अंदाज

Weather Report : एप्रिल महिना संपत आला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचे वारे वाहू लागले आहे. तसेच अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या जवळपास पोहचले देखील आहे. दरम्यान सध्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात काहीसा चढ उतार पाहायला मिळतो आहे. मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा चढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातच […]

Untitled Design (84)

Untitled Design (84)

Weather Report : एप्रिल महिना संपत आला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचे वारे वाहू लागले आहे. तसेच अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या जवळपास पोहचले देखील आहे. दरम्यान सध्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात काहीसा चढ उतार पाहायला मिळतो आहे. मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा चढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातच मे महिन्यात उष्णतेची लाट येऊ शकते असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे एप्रिल महिना संपत आला तरीही उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या नव्हत्या. कधी ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे. मात्र आता मे महिना सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक आहे. यातच हवामान विभागाने महत्वाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या अनेक भागांमध्ये मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागू शकतो. ही उष्णता इतकी जास्त असेल, की त्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित होऊ शकतो. देशाच्या पूर्व-मध्य आणि पूर्व भागात मासिक कमाल तापमान सर्वसाधारणपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारताच्या काही भागांतही हवामान उष्ण असेल.

दरम्यान गेल्या वर्षी भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला होता. तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढू शकतो. तापमानवाढीमुळे आपलं शरीर थंड ठेवणं शक्य होत नाही. यामुळे अनेक आजारांना देखील आयते निमंत्रण हे मिळते. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज जरी हवामान खात्याने दिला असला तरी तूर्तास अद्याप तशी परिस्थिती दिसत नाही.

Arjun Rampal पुन्हा होणार बाबा, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने केलं बेबी बंप फ्लॉन्ट

मे महिन्याच्या सुरुवातीला भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे. सध्यादेखील महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली आहे. यामुळे आधीच शेकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Exit mobile version