‘मिमिक्री एक कला, धनखड यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता; कल्याण बॅनर्जींची स्पष्टोक्ती

TMC MP Kalyan Banerjee On Jagdeep Dhankhar Mimicry : संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांच्या मिमिक्रीवरील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी दिले […]

'मिमिक्री एक कला, धनखड यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता; कल्याण बॅनर्जींची स्पष्टोक्ती

Letsupp Image 2023 12 20T120925.534

TMC MP Kalyan Banerjee On Jagdeep Dhankhar Mimicry : संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांच्या मिमिक्रीवरील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी दिले आहे. उपराष्ट्रपतींबद्दल माझ्या मनात खूप आदर असल्याचे सांगत पंतप्रधांनीदेखील मिमिक्री केल्याची संदर्भ बॅनर्जी यांनी यावेळी दिला.

धनखड यांच्या अपमानामुळे निराश झाले

धनखड यांच्यावरील मिमिक्रीनंतर देशाच्या राष्ट्रपती मूर्मू  यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी ‘संसदेच्या आवारात आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्या प्रकारे अपमान झाला ते पाहून मी निराश झाल्याचे म्हटले आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे, परंतु त्यांची अभिव्यक्ती प्रतिष्ठा आणि शिष्टाचाराच्या नियमांत असावी असेही मूर्मू म्हणाल्या.

20 वर्षांपासून अपमानाचा सामना; मोदींचा धनखड यांना फोन

मूर्मू यांच्याबाबत घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना  फोन केला. यावेळी मोदींनी झालेल्या गैरवर्तनाबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच गेल्या 20 वर्षांपासून आपण स्वत: अशा अपमानाचा सामना करत असून, हा प्रकार अजूनही सुरू असल्याचे सांगितले. परंतु, उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीबाबत अशी घटना संसद परिसरात घडणं हे दुर्दैवी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी कोण?

जगदीप घडखड यांची मिमिक्रीकरून राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे म्हणजेच तृणमूल काँग्रेसचे लोकसभेचे खासदार आहेत. ते पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर या मतदारसंघातून 2019 ला निवडून आलेले आहेत. 2001 ते 2006 या दरम्यान ते आमदार देखील होते. बॅनर्जी एक ख्यातनाम वकील देखील आहेत. तृणमूल पक्षाची कायदेशीर लढाई ही बॅनर्जी यांच्याकडूनच लढली जाते. तर या अगोदर नुकतच कल्याण बॅनर्जी यांचे एक वक्तव्य व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, नव्या संसदेत वॉशरूमसाठी अर्धा किलोमीटर दूर जावं लागतं. त्यावरून देखील गदारोळ झाला होता.

 

Exit mobile version