Anurag Thakur : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान लोकसभेत वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील आक्रमक पाहायला मिळाले. तर अनेक भाजप खासदार देखील आक्रमक झाले होते. त्यापैकी एक होते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर. मात्र सोशल मीडियावर अनुराग ठाकूर आता एका वेगळ्या कारणारे चर्चेत आहे.
राहुल गांधी यांचा विरोध करण्यासाठी अनुराग ठाकूर जेव्हा उभे राहिले होते तेव्हा कॅमेऱ्यात चुकून त्यांनी घातलेला महागडा बेल्ट कैद झाला. यानंतर आता सोशल मीडियावर अनुराग ठाकूर यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
बेल्ट कोणत्या कंपनीचा होता?
लोकसभेच्या कामकाजादरम्यान रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये, अनुराग ठाकूर यांनी घातलेला बेल्ट एका लक्झरी आंतरराष्ट्रीय ब्रँडचा दिसत आहे. बेल्ट लुई व्हिटॉन (LV) ब्रँडचा असल्याचे वृत्त आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचा दावा आहे की कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मंत्री बेल्ट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसले, परंतु तोपर्यंत व्हिडिओ व्हायरल झाला होता.
बेल्टची किंमत किती?
व्हायरल दाव्यांनुसार, या लुई व्हिटॉन (LV) बेल्टची किंमत सुमारे 82 हजार असल्याचे सांगितले जाते. ही माहिती समोर येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहीले की, ते गरिबांचा आवाज उठवण्यासाठी 75,000 रुपयांचा बेल्ट घालून सभागृहात येतात, ही कमलची बाब आहे.”
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, प्रत्येकाला त्यांचे उत्पन्न माहित आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, या देशातील भाजप खासदार आजकाल अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. जे परदेशी ब्रँड घालतात, त्यांच्या मुलांना परदेशी शाळांमध्ये पाठवतात आणि जनतेला स्वदेशी आणि गुरुकुलचा उपदेश करतात. हे धोरण नाही, ते ढोंग आहे. गरिबांसाठी उपदेश, स्वतःसाठी सुविधा.
Anurag Thakur who tells children of poor Hindus to leave education and come on the streets to save religion was seen wearing a INR 80,000 imported Louis Vuitton Belt in Lok Sabha.
He got scared and hid it when it accidentally got exposed on camera because just a few minutes ago… pic.twitter.com/yOGWQdQBaf
— Roshan Rai (@RoshanKrRaii) February 3, 2026
लोकसभेत राडा, पेपर भिरकवल्याने आठ खासदार निलंबित, विरोधकांचा संसदेच्या आवारात निषेध
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या टी-शर्टवरुन भाजपकडून जोरदार टीका करत होती मात्र आता भाजपचे देखील खासदार परदेशी लक्झरी ब्रँड वापरताना दिसत आहे.
