Download App

“तामिळनाडूला स्वायत्त बनवा”, CM स्टॅलिन यांचा मोठा डाव; विधानसभेत प्रस्ताव सादर

तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत सादर केला आहे.

Tamil Nadu News : तामिळनाडू राज्यातून एक मोठी बातमी समोर (Tamil Nadu News) आली आहे. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे. तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा प्रस्ताव स्टॅलिन यांनी विधानसभेत सादर केला आहे. प्रस्ताव सादर करताना स्टॅलिन म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या देशात विविध भाषा, जाती आणि संस्कृतींचे लोक राहतात. आपण सगळेच मिळून मिसळून राहत आहोत.

राज्याच्या अधिकारांचे संरक्षण आणि केंद्र राज्य यांच्यातील संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी अधिकारी अशोक शेट्टी आणि एमयू नागराजन यांच्यासारखे लोक असतील. समिती जानेवारी 2026 पर्यंत एक अंतरिम अहवाल सादर करील तसेच दोन वर्षांच्या आत एक संपूर्ण रिपोर्ट आणि शिफारसी राज्य सरकारला सादर करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दिली.

राज्यपालांकडे वीटो नाही, राजकीय कारणांसाठी.. तामिळनाडूच्या राज्यपालांना ‘सुप्रीम’ दणका

यानंतर स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील राज्यांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. राज्यांतील नागरिक आपल्या मौलिक अधिकारांसाठी केंद्र सरकारशी संघर्ष करत आहेत. आम्हाला आमच्या भाषेशी संबंधित अधिकारांचे रक्षण करण्यातही अडचणी येत आहेत.

बातमी अपडेट होत आहे..

follow us