Download App

Mobile मध्ये इमर्जन्सी अलर्ट अनिवार्य : अन्यथा ६ महिन्यांत फोन होणार…

Emergency alert in Smartphones : केंद्र सरकारने मोबाइलमध्ये आपत्कालिन फीचर आता बंधनकारक केले आहे. येत्या सहा महिन्यांची यासाठी मुदत दिली आहे. केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर देणं बंधनकारक केलं आहे. जर या आदेशानंतरही स्मार्टफोन कंपन्यांनी फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर दिले नाही. तर संबंधीत कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशाराही केंद्र सरकारने दिले आहे. त्यात इमर्जन्सी अलर्ट फीचरशिवाय स्मार्टफोनच्या विक्रीवरही भारतात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.

गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीचे दाऊद, लष्कर-ए-तोयबाशी संबंध! – Letsupp

स्मार्ट फोनमध्ये जर आपत्कालिन अलर्ट फीचर बंधनकारक केले तर यूजर्सना भूकंपाचा इशारा मिळणार आहे. भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी यासह इतर अनेक नैसर्गिक आपत्तींबाबत मोबाईल वापरकर्त्यांना पूर्व कल्पना देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार पूर, आपत्ती, भूकंप यासारखी माहिती या स्मार्ट फोनद्वारे त्वरित मेसेज देता येणार आहे.

केंद्र सरकारने जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालिन अलर्ट फीचर देण्याचं बंधनकारक केले आहे. तर या आदेशाचे उल्लंघन करणार्या कंपन्यांचे स्मार्टफोन बंद करण्यात येणार आहे. त्यामळे सर्व मोबाईल उत्पादकांना या पुढील काळात केवळ आपत्कालिन अलर्ट फीचर स्मार्टफोन विकण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे.

Tags

follow us