मोदींना पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण! जॉर्जिया मेलोनींपासून श्रीलंकेच्या राष्ट्रपतींपर्यंत जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Modi completes 12 years as PM यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पुर्ण केले या तपपूर्तीनिमित्त शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत.

Modiii

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारप्रमुख म्हणून नवा रेकॉर्ड, 'या' नेत्याला टाकलं माग

Modi completes 12 years as PM shower of wishes from Giorgia Meloni to President of Sri Lanka : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 जून रोजी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पुर्ण केले आहेत. त्यामुळे मोदी यांची तुलना थेट देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर राहणाऱ्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली जात आहे. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर भाजप आणि समर्थकांकडून देशभर या तपपूर्तीचा उत्साह साजरा केला जात आहे. तसेच इटलीच्या पंतप्रधान मेलोनींपासून जगभरातून मोदींसाठी या तपपूर्तीनिमित्त शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. पाह कोण काय म्हणालं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी –

मोदी यांनी आज भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे पंतप्रधान होत 12 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला.नुकतीच त्यांची रोममध्ये भेट झाली. राजनैतिक करार आणि चर्चा झाली ज्यातून आमचे देश आणि जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील.

इथोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली –

मी माझे मोठे भाऊ नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देतो. त्यांनी आज भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे पंतप्रधान होत 12 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. त्यांनी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा विश्वास जिंकला आहे. त्यांच्या कार्यकाळात लाखो लोक गरिबीतून बाहेर आले. मोठ्या प्रमाणावर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर केलं. ते दक्षिण जगाचे मजबूत आवाज कायम राहावे.

मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख

माझे आणि मंगोलियाच्या जनतेचे प्रिय मित्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनःपूर्वक शुभेच्छा. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून येणे आणि आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे नेते बनणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. हे यश आपल्या नेतृत्वगुणांचे आणि भारतीय जनतेने आपल्यावर दाखवलेल्या अटळ विश्वासाचे प्रतिक आहे. मंगोलिया-भारत धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यास मला आनंद होईल. आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि सातत्यपूर्ण यशासाठी शुभेच्छा. भारतातील मैत्रीपूर्ण जनतेच्या प्रगती आणि कल्याणासाठीही माझ्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार डिसनायके

भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल मी नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. श्रीलंका भारतासोबतच्या निकटच्या भागीदारीला मोठे महत्त्व देते आणि दोन्ही देशांतील दीर्घकालीन संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करते.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम

भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. ही कामगिरी त्यांच्या दीर्घकालीन जनसेवेचे, भारताच्या विकास आणि समृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वाचे तसेच जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मलेशिया भारतासोबतच्या आपल्या दीर्घकालीन आणि घनिष्ठ मैत्रीला मोठे महत्त्व देते. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुढील यशासाठी तसेच भारताच्या जनतेसाठी शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या शुभेच्छा.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबु

भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय जनतेने सलग तीन कार्यकाळांमध्ये त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. जनसेवेप्रती त्यांची निष्ठा, राष्ट्रीय विकासासाठीची बांधिलकी आणि जागतिक स्तरावरील प्रभावी नेतृत्व जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. नरेंद्र मोदी हे केवळ नायजेरियाचे चांगले मित्र नाहीत, तर माझे वैयक्तिक मित्र आणि विश्वासू सहकारीही आहेत. त्यांच्या दूरदृष्टीचे, धैर्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठीच्या समर्पणाचे मी नेहमीच कौतुक केले आहे. नायजेरियाच्या सरकार आणि जनतेतर्फे त्यांच्या उत्तम आरोग्य, यश आणि भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी शुभेच्छा.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू

भारताचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल महामहिम नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. परस्पर आदर, सार्वभौम समानता आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारे भारतासोबतचे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी मालदीव उत्सुक आहे.

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम सामोई रूटो

जनसेवेतील ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान ठरलात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सलग तीन वेळा मिळालेला जनादेश हा भारतीय जनतेने आपल्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. सामान्य कुटुंबातून या सर्वोच्च पदापर्यंतचा आपला प्रवास समर्पण, चिकाटी आणि जनसेवेचे उदाहरण आहे. केनिया भारतासोबतच्या मजबूत आणि दीर्घकालीन भागीदारीला महत्त्व देते आणि दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी सहकार्य अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली-जे-म्युंग

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण अनेक वर्षे भारताच्या विकास आणि प्रगतीचे नेतृत्व केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय जनतेने आपल्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. एप्रिलमध्ये आपण कोरिया-भारत विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि विकास व नवोन्मेषाने भरलेले भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार केला होता. आपल्यासोबतचा विश्वास आणि मैत्री अधिक दृढ करून दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी ठोस परिणाम साध्य करण्याची मला अपेक्षा आहे. आपल्या उत्तम आरोग्यासह भारताच्या जनतेसाठी सुख, समृद्धी आणि आनंदाच्या शुभेच्छा.

 

Exit mobile version