आणखी एक धक्का, सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासून लागू

Customs Duty On Gold : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सोने आणि चांदीच्या आयत शुल्कात वाढ केली आहे. ही शुल्कवाढ मंगळवारी (12 मे) रात्रीपासून

Customs Duty On Gold

Customs Duty On Gold

Customs Duty On Gold : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सोने आणि चांदीच्या आयत शुल्कात वाढ केली आहे. ही शुल्कवाढ मंगळवारी (12 मे) रात्रीपासून अंमलात आली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोन्यावरील ‘मूलभूत सीमा शुल्क’ (Basic Customs Duty – BCD) 5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर 5 टक्के ‘कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर’ (AIDC) लागू करण्यात आले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात देखील आज या निर्णयाचा परिणाम दिसण्याची शक्यता असून सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सरकारने जुलै 2024  च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील एकूण आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. या कपातीमध्ये मूलभूत सीमा शुल्क (BCD) 10 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत करण्यात आले होते तर उपकर (AIDC) 5 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र आता हे दोन्ही शुल्क पुन्हा वाढवण्यात आले आहेत. ज्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

द टाइम्स ऑफ इंडिया च्या एका अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात (2025-26), भारताने विक्रमी 71.98 अब्ज डॉलर्स किंवा 6 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे सोने आयात केल जी मागील वर्षाच्या तुलनेत 24% ची वाढ दर्शवते. चीननंतर, भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक देश आहे.

सरकारच्या निर्णयानुसार, आयात शुल्क आणि उपकराचे नवीन दर केवळ सोन्याच्या बिस्किटांवर नव्हे, तर दागिन्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या लहान घटकांवरही लागू होणार आहे. जसे की हुक्स, पिन्स, स्क्रू इत्यादी. याचबरोबर सरकारने केवळ आयात शुल्क आणि उपकरच वाढवलेले नाहीत तर जुन्या धातूंमधून सोने आणि चांदी वेगळे करण्याच्या उद्देशाने आयात केल्या जाणाऱ्या ‘स्क्रॅप’ साहित्यावरील करातही 10 टक्क्यांनी वाढ केली आहे.

सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?

आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचे परिणाम सामान्य माणूस आणि उद्योग क्षेत्र या दोघांवरही होतील. परदेशातून सोने आणि चांदी आयात करताना आता सराफ आणि व्यापाऱ्यांना अधिक खर्च करावा लागेल. इनपुट खर्चातील (कच्च्या मालाच्या खर्चातील) या वाढीमुळे सोने, चांदी आणि या धातूंपासून बनवलेल्या दागिन्यांच्या किमती वाढणार आहे.

‘या’ 5 राशींना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?

एक वर्ष सोने खरेदी करणे टाळा – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी सोन्याची खरेदी करणे टाळण्याचे, परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे, रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे, खाद्यतेलाचा वापर किमान पातळीवर आणण्याचे आणि पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, वर्षभरात केल्या जाणाऱ्या माफक बचतीमुळे परकीय चलनाच्या (Forex) स्वरूपात सुमारे 13 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते.

Exit mobile version