Download App

Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांनी महाराष्ट्राचे (Maharashtra)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि लडाखचे (Ladakh)उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर (Radha Krishnan Mathur)या दोघांचाही राजीनामा (Resignation)मंजूर करण्यात आलाय. राष्ट्रपतींनी देशातील एकूण 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलीय. त्याचबरोबर गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) यांच्याकडं आसाम तर माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला (Shivpratap Shukla)यांना हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आलीय.

जाणून घ्या, नवनियुक्त राज्यपाल आणि उपराज्यपालांची संपूर्ण यादी


1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
2. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम
3. सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
4. शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
5. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
6. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
7. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ
8. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर
9. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
10. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
11. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
12. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
13. निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख.

‘रमेश बैस’ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Tags

follow us