Download App

लोकसभेसाठी BJP चं कौटुंबिक कार्ड; मी चौकीदार नंतर, मी मोदींचं कुटुंब’; नेत्यांनी बदललं ‘X’ बायो

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते तरूण चेहरा आणि कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यांने त्यांचे X वरील प्रोफाइलच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. 2019 मध्ये अशाच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ‘मी चौकीदार’ असे लिहिले होते. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या X प्रोफाईच्या बायोमध्ये ‘मी मोदीचे कुटुंब’ असे लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेलंगणातील आदिलाबाद येथे जाहीर सभेत संपूर्ण देश हे त्यांचे (पीएम मोदी) कुटुंब असल्याचे म्हटल्यानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या एक्स-बायोमध्ये हा बदल केला आहे. (BJP Leader Change There X Bai Information)

RJD प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नसल्याचे भाष्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. लालूंच्या या विधानाला मोदींनी जोरदार प्रत्युत्तर देत संपूर्ण देश माझं कुटुंब असल्याचे म्हटले आहे. मोदींच्या या विधानानंतर आता भाजप नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शववत नव्या मोहिमेचा श्री गणेशा केला आहे. याचाच एक भाग म्हणून अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरींसह अन्य नेत्यांनी त्यांच्या X बायोमध्ये ‘मी मोदींचे कुटुंब’ असा बदल केला आहे.

मोठी बातमी : खासदार, आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर चालणार खटला

मोदींच्या विधानानंतर बायोमध्ये बदल करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, अनुराग ठाकूर आदी नेत्यांची त्याचा X वरील बायोमध्ये बदल केला आहे. या बदलावरून आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी कौटुंबिक कार्ड बाहेर काढले असून, एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला कौटुंबिक दृष्टिकोनातून मतदारांना आकर्षित करायचे असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मोदींच्या रडारवर विरोधक

तेलंगणात बोलताना मोदींनी विरोधकांचा चांगलाच सडकून समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदींना कुटुंब नाही. मात्र, मी लहानपणी देशवासीयांसाठी जगेन असे स्वप्न घेऊन घर सोडले होते. माझे कोणतेही वैयक्तिक स्वप्न नाही. तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मी माझे आयुष्य घालवीन असे मोदी म्हणाले. देशातील करोडो जनता मला आपले मानते. त्यामुळे 140 कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. ज्यांचे कोणी नाही तेही मोदींचे आणि मोदी त्यांचे असल्याचे ते म्हणाले.

भाजपने सुरू केले देणगी अभियान, PM मोदींनी पार्टी फंडासाठी दिली ‘इतकी’ रक्कम

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडलेले इंडिया आघाडीचे नेते अस्वस्थ होत आहेत. या अस्वस्थेतून त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी खरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जेव्हा जेव्हा मी विरोधकांच्या कुटुंबवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा तेव्हा तेव्हा त्यांनी मोदींना कुटुंब नसल्याचा उल्लेख केला आहे. उद्या हेच तुम्हाला कधीही तुरुंगवास झाला नाही, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही असे भाष्यदेखील करू शकतात असेही मोदी म्हणाले.

follow us