नरेंद्र मोदी लबाडांचे सरदार, 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

नरेंद्र मोदी लबाडांचे सरदार, 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

Mallikarjun Kahrge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमी आपल्या भाषणात मोदींची हमी, मोदींची हमी, असं बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच मी पणा असतो. आपण बोलताना ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो. पण मोदी मी मी करतात. नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत आहेत, ते लबाडांचे सरदार आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kahrge) यांनी केला.

ते पुढं म्हणाले की मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही हमी पूर्ण केलेली नाही. 2014 मध्ये मोदींनी काळा पैसा आणला का? प्रत्येकाला 15 लाख रुपये दिले का? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या दिल्या का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले का? मोदींच्या हमीचे काय झाले? असा सवाल खरगे यांनी केला. लोणावळा येथे काँग्रेसने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी ते बोलत होते.

2024 ची लोकसभा निवडणूक आपल्यासाठी ‘करा किंवा मरो’ अशी आहे. या निवडणुकीत भाजपाचा पराभव करावा लागला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि माविआला चांगले वातावरण आहे पण त्यासाठी लोकांच्या घरी जावे लागेल. मतदार यादी अद्ययावत करावी लागेल. बूथ लेव्हल पर्यंत काम करा, निवडणुकीत BLA चे काम सर्वात महत्वाचे आहे, त्यांची नियुक्ती करा. भाजपच्या गुंडगिरीला आणि धार्मिकवादाला जनता कंटाळली आहे. सर्वांनी एकत्र काम केल्यास काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

चव्हाणांच्या राजीनाम्याचे नगरमध्ये पडसाद, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या व्यासपीठावर

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी वातावरण अनुकूल आहे. सर्व राज्यांचा दौरा केल्यानंतर आढावा घेतला. त्यानंतर आता हे शिबिर घेण्यात येत आहे. महाविकास आघाडी राज्यातील सर्व 48 लोकसभा जागांवर निवडणूक लढवत आहे. राज्यातील वातावरण लक्षात घेता माविआ सर्वाधिक जागा जिंकेल. केंद्र सरकारने काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीत भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकदिलाने लढून विजय संपादन करावा, असे आवाहन रमेश चेन्निथला यांनी केले.

Shivajirao Aadhalrao Patil यांच्या राजकीय ताकदीला बूस्टर; पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड

follow us
  • fb
  • instagram
  • youtube