Download App

राहुल गांधींची खासदारकी रद्द, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचं ते जुनं ट्विट व्हायरल, म्हटलं, “मोदी म्हणजे…”

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यावर भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांचे सध्या ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोदी म्हणजे भ्रष्टाचार’ (Modi Means Corruption) असे ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच, ‘मोदी’ या शब्दाची व्याख्या आता ‘भ्रष्टाचार’ अशी करावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

काँग्रेसनेही या ट्विटची दखल घेत भाजपवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे.भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशाच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी खुशबू सुंदर यांचे ट्विट रिट्विट केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे ट्विट लाईक करत त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

काहींनी हे ट्विट राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप नेते पुर्णेश मोदी यांना देखील टॅग करून त्यांच्यावर टीका करत आहेत. विशेष म्हणजे इतके सगळे घडताना किंवा घडून गेल्यानंतर अद्यापही खुशबू सुंदर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा आपल्या ट्विटर टाईमलाईनवरुन ट्विट काढले देखील नाही.

नेमकं काय म्हणाल्या खुशबू सुंदर ?

भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी हे ट्विट 2018 मध्ये केले आहे. हे ट्विट केले तेव्हा खुशबू सुंदर काँग्रेस पक्षात होते. पुढे त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. आपल्या ट्विटमध्ये खुशबू सुंदर यांनी हिंदीमध्ये केल्या ट्विटचा मराठी अर्थ असा की, ‘इथे तिथे सर्वत्र कुठेही पाहा मोदी… पण हे काय ? प्रत्येक मोदीच्या पुढे भ्रष्टाचार आडनाव लागले आहे. चला मोदी आडनावाचा अर्थ आता भ्रष्टाचार असाच करु’. या ट्विट बरोबरच खुशबू सुंदर यांनी #Nirav #Lalit #Namo = Corruption.. असे सूत्र मांडत हॅशटॅगचा वापर देखील त्यांनी केला होता.

राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा

काय आहे नेमकं प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. या निर्णयामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली. राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाली आहे असे म्हणत काँग्रेस नेते यांनी निषेध नोंदवला. काँग्रेसने गांधींच्या अपात्रतेविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Tags

follow us