राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसने (Congress) सोमवारपासून संविधान वाचवा आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले की, गाव, तालुका, जिल्हा स्तरापासून राजधानीपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. अदानी घोटाळ्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल राहुल गांधींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
7 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर संसदेत भाषण केले होते. 27 फेब्रुवारीला सूरत कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि 23 मार्चला शिक्षा जाहीर झाली. आंदोलनाची जबाबदारी सोपवण्यासाठी समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात, भाजपचा हल्लाबोल
भेटीनंतर प्रियंका गांधी म्हणाल्या- आमच्या रक्तवाहिनीत शहीदांचे रक्त आहे, जे या देशासाठी सांडले आहे. आम्ही कठोर लढा देऊ, आम्ही घाबरणार नाही. राहुल गांधी यांनी अदानी-मोदी संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचे उत्तर सरकारला द्यायचे नाही. राहुल यांच्यावरील कारवाई या प्रश्नाचे फलित आहे.
माझ्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नाही, अनिल देशमुखांची विधानसभेत माहिती
येथे राहुल गांधींच्या समर्थनार्थ पक्षाने सोशल मीडियावर ‘डरो मत’ मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या ट्विटर हँडलवरही हे पोस्ट करण्यात आले आहे. पक्षाचे कार्यकर्ते शेअर करत आहेत. याशिवाय पक्षाच्या निदर्शनांमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्सवरही या घोषणेचा वापर ठळकपणे केला जात आहे.