नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार 800 कोटी रुपये जमा करणार आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून दिली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी जे 13व्या हप्त्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत होते, त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे.
पंतप्रधान मोदी कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित कार्यक्रमात पीएम-किसान योजनेचा 13 वा हप्ता जारी करतील. पीएम किसान आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थ्यांसह सुमारे एक लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषी सचिव मनोज आहुजा उपस्थित राहणार आहेत.
जाणून घ्या काय आहे योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. ही योजना फेब्रुवारी, 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे.
मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान
पीएम-किसान योजनेचा 11वा हप्ता मे 2022 मध्ये जारी करण्यात आला होता तर 12वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये जारी करण्यात आला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 2.25 लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. यापैकी 1.75 लाख कोटी रुपये कोविड-19 काळात शेतकऱ्यांना अनेक हप्त्यांमध्ये देण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
पीएम-किसान योजनेच्या यादीत आपले नाव चेक करण्यासाठी ‘या’ स्टेपस फॉलो करा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
आता होम पेजवर डॅश बोर्डवर क्लिक करा.
यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि गाव निवडा.
आता तुमच्या स्क्रीनवर लिस्ट ओपन होईल.
यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.