मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मेघालय, नगालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya) आणि नागालँड (Nagaland) या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections)आज मतदान होणारंय. यासाठी दोन्ही राज्यातील मतदार सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडूनही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलीय.

दोन्ही राज्यांसह एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणारंय. मेघालय आणि नागालँडमध्ये 59 जागांसाठी मतदान होणारंय. दोन्ही राज्यांसह 550 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. तर, मेघालय, नागालँड आणि त्रिपुराची मतमोजणी 2 मार्चला होणारंय.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

मेघालयात सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. 2018 ची निवडणुकीत एकत्र लढलेल्या भाजप (BJP) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) यांनी निवडणूकपूर्व युती केलेली नाही. मेघालयचे माजी मंत्री आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (यूडीपी) चे उमेदवार एचडीआर लिंगदोह यांच्या निधनामुळं Sohiong जागेवरील मतदान पुढं ढकलण्यात आलंय. त्यामुळं 60 पैकी 59 जागांवर आज मतदान होणारंय.

यावेळी भाजप आणि काँग्रेसनं राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर एनपीपी 57 जागांवर निवडणूक लढवताहेत. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राज्यातील 58 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

नागालँडमध्ये, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजप यांची युती आहे. त्यांची मुख्य स्पर्धा राज्याचा माजी सत्ताधारी पक्ष, नागा पीपल्स फ्रंट (NPF) सोबत आहे. अकुलुतो मतदारसंघातून भाजपचे उमेदवार काजेतो किनिमी बिनविरोध विजयी झाल्यामुळं राज्यातील 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान होणारंय. त्याच्या प्रतिस्पर्ध्यानं शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं ते बिनविरोध विजयी झालेत. भाजप 20 तर एनडीपीपी 40 उमेदवारांसह रिंगणात आहे. NPF 22 आणि कॉंग्रेस 23 जागांवर निवडणूक लढवताहेत. दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर युती करण्याच्या विचारानं रिंगणात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube