Download App

मणिपूरसाठी मोदींनी मला पहाटे 4 वाजता झोपेतून उठवले; अमित शहांनी सांगितली ‘ती’ घटना

Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे 4 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता झोपेतून उठवलं. विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरडे लक्ष नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या, 36,000 जवान पाठवले. मुख्य सचिव बदलले, डीजीपी बदलले. सुरक्षा सल्लागार पाठवले गेले, अशी माहिती देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींवर होणारे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचारावरील चर्चेपासून विरोधक पळ काढल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मी मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी सरकार तयार आहे. विरोधकांना चर्चा नको आहे. त्यांना फक्त निषेध करायचा आहे. जर ते माझ्या चर्चेने समाधानी नसतील तर पंतप्रधानही निवेदन देण्याचा विचार करतील.

सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेच्या आरोपांवर शाहांचा पलटवार

अमित शहा म्हणाले, तुम्हाला असं वाटतंय की, गोंधळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल. मला गप्प करू शकत नाही. देशातील जनतेचा पाठिंबा आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसक घटनेबद्दल मी सविस्तर उत्तर देणार आहे. मी विरोधकांच्या मताशी सहमत आहे की मणिपूरमध्ये हिंसाचाराचा नंगा नाच झाला आहे. अशी घटना कोणीही मान्य करू शकत नाही. ही घटना लज्जास्पद आहे.

लोकसभेत राहुल गांधींना घेरताना अमित शाहांनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ कोण?

मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही
अमित शहा म्हणाले, “भारत सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना पाठवले आहे. 3 तारखेला हिंसाचार झाला आणि 4 तारखेला सर्व काही संपले. ते म्हणतात की 356 (राष्ट्रपती राजवट) का लागू करण्यात आली नाही. 356 तेव्हाच लावले जाते जेव्हा हिंसाचाराच्या काळात सरकार मदत करत नाही. आम्ही केलेले बदल राज्य सरकारने मान्य केले आहेत. मुख्यमंत्री मदत करत नाहीत तेव्हा त्यांना बदलावे लागते. मुख्यमंत्री मदत करत आहेत.”

Tags

follow us