Infosys : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोशी गेल्या दिर्घकाळापासून दिग्गज आयटी कंपनीत इन्फोसिसमध्ये कार्यरत होते. इन्फोसेसेला रामराम केल्यानंतर आता जोशी ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेक महिंद्रामध्ये रूजू होणार आहेत.
जोशी यांची टेक महिंद्रा कंपनीत MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसचे विद्यमान MD आणि CEO सीपी गुरनानी 19 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर इन्फोसिसचे माजी अध्यक्ष मोहित जोशी टेक महिंद्राचे नवे एमडी आणि सीईओ असतील असे कंपनीने म्हटले आहे.
जोशी यांनी सलग 22 वर्षे इन्फोसिससोबत काम केले आहे. 2020 पासून इन्फोसिससोबत काम करताना त्यांनी कंपनीच्या वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान व्यवसाय विभागासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आयटी कंपनीत दीर्घकाळ काम केल्यानंतर मोहित जोशी टेक महिंद्रात रुजू होणार आहेत. 9 जून 2023 हा त्यांचा इन्फोसिस बोर्डावरील शेवटचा दिवस असेल.
Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…
टेक महिंद्रासोबत सुरू करणार नवीन इनिंग
टेक महिंद्रासोबत नवी इनिंग सुरू करणाऱ्या मोहित जोशी यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. इन्फोसिसच्या आधी त्यांनी कॉर्पोरेट आणि गुंतवणूक बँकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी हॉवर्ड कॅंडी स्कूलमधून ग्लोबल लीडरशिप आणि पब्लिक पॉलिसी प्रोग्राम केला आहे. मोहित जोशी 20 डिसेंबर 2023 पासून टेक महिंद्रा कंपनीच्या संचालक मंडळात सामील होणार असून, 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. विद्यामान सीपी गुरनानी यांची ते जागा घेतील असे कंपनीने म्हटले आहे.