Amit Shah on POK : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा (Operatiin Sindoor) सुरू आहे. या चर्चेत भाग घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पु्न्हा एकदा काँग्रेस पक्षावर (Congress Party) घणाघाती टीका केली. पाकव्याप काश्मीर देण्याचं काम काँग्रेसने केलं होतं परंतु, केंद्रातील भाजप सरकार हाच पीओके पु्न्हा (POK) आणण्याचं काम करणार आहे, अशा शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसला त्यांच्या चुकांची आठवण करून दिली. दरम्यान, अमित शाह यांनी याआधीही अनेकदा पीओकेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंडीत नेहरू यांच्या चुकीमुळेच आज पीओकेची समस्या निर्माण झाली असा आरोप त्यांनी याआधी केला होता.
अमित शाह पुढे म्हणाले, आता काश्मीरमध्ये दगडफेकीत तेथील युवक सहभागी होत नाहीत. अतिरेकी संघटनांतही युवक सहभागी होत नाहीत. या ठिकाणी जितके अतिरेकी मारले जात आहेत ते सगळे पाकिस्तानी आहेत. ज्यावेळी काश्मीर राज्य अस्तित्वात आलं त्यावेळी 370 कलम तयार करण्यात आलं होतं. काँग्रेसनेच 370 कलम तयार केलं. काश्मीरमध्ये आधी फुटीरतेच्या चर्चा होत होत्या. नंतर स्वातंत्र्याच्या चर्चा होऊ लागल्या. या घडामोडींना पाकिस्तानला शह देत होता. येथील तरुणांची माथी भडकावण्याचं काम सातत्याने केलं जात होतं. फक्त मतांसाठी काँग्रेसने या फुटीरवादी संघटनांना रोखण्याचं साधं कामही केलं नाही अशा शब्दांत शाह यांनी संताप व्यक्त केला.
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
काँग्रेसचं घातक राजकारण कारणीभूत
देशभरात दहशतवाद पसरण्यालाही काँग्रेसचं बोटचेपं धोरण आणि तुष्टीकरणाचं राजकारण कारणीभूत होतं. जर 1965 चं युद्ध निर्णायक होतं तर मग दहशतवाद कसा पसरला? 1971 चं युद्ध निर्णायक होतं तर मग दहशतवाद कसा पसरला? जोपर्यंत तुमचा शत्रू घाबरत नाही किंवा त्याच्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत लढाई निर्णायक मानली जात नाही. काँग्रेस सरकारच्या काळात नुसतेच डोजियर पाठवले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट अॅक्शन घेतली. आता अतिरेकी घाबरून आहेत असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही जोरदार टीका केली. चिदंबरम पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) दोषी अतिरेकी मारले गेले याचे पुरावे आता मागत आहेत. ते नेमकं कुणाला वाचवण्याचं काम करत आहेत? पाकिस्तानला की अतिरेक्यांना? असा सवाल गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विचारला.
दगडफेकीची एकही घटना घडली नाही
जम्मू काश्मीरमध्ये 2010 ते 2015 दरम्यान 2 हजार 564 दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. 2024 नंतर या राज्यात दगडफेकीची एकही घटना घडली नाही. आंदोलनांच्या घोषणा हुर्रियतचे नेते पाकिस्तानात बसून करत होते. वर्षातील 132 दिवस काश्मीर बंद ठेवले जात होते. आता मागील तीन वर्षांपासून एकही उपोषण वा आंदोलनाची घोषणा झालेली नाही कारण त्यांच्यात आता हिंमतच राहिलेली नाही.
पाकिस्तान भारतावर खूप मोठा हल्ला करणार; अमेरिकेचा पंतप्रदान मोदींना फोन, तेव्हा नक्की काय घडलं?