पाकिस्तान भारतावर खूप मोठा हल्ला करणार; अमेरिकेचा पंतप्रदान मोदींना फोन, तेव्हा नक्की काय घडलं?

Narendra Modi On Operation Sindoor : संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं? भारताने ऑपरेशन सिंदूर कसं पार पाडलं गेलं? याबाबत सांगितलं. (Sindoor) तसंच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानच्या एका मोठ्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पाकिस्तानने तब्बल 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता, असं मोदींनी सांगितलं.
पाकिस्तानच्या या मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या कोणत्याही भागात पडले असते तर मोठा विध्वंस झाला असता असेही मोदी यांनी सांगितले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोन्सना नेस्तनाबूत केले. मी आज एक आकडा सांगणार आहे. हा आकडा ऐकून संपूर्ण देशाचा उर गर्वाने भरून येईल. 9 मे रोजी पाकिस्तानने जवळजवळ 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मोदींनी संसदेत दिली.
सैनिक म्हणजे टायगरला तुम्ही बांधू शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरून राहुल गांधींचा सरकारवर वार
तसेच, या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भगावर पडल्या असत्या तर तिथे मोठा विध्वंस झाला असता. पण या 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशातच हाणून पाडले, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसंच, पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसवरली गेली. मी दुसऱ्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं. तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली.
राजकारणात काही नवे पक्ष आहेत, त्यांना सत्तेचा अनुभव नाही. त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या तर समजू शकतो. पण काँग्रेसने सत्ता भोगली आहे. त्यांना शासनव्यवस्था माहीत आहे. त्यांना अनुभव आहे. तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं तरी त्याला स्वीकारत नाही, गृहमंत्री बोलले, संरक्षण मंत्री बोलले त्यांच्यावर विश्वास नाही, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.