धर्मगुरुकडून ८० हून अधिक महिलांचा लैंगिक छळ

मदुराईः तामिळनाडू राज्यात एका कॅथॉलिक धर्मगुरुने महिलांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात ही घटना घडलीय. या प्रकरणी आरोपी फादर बेनेडिक्ट अँटोविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला नागरकोइल येथील फॉर्महाउसमधून पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. या धर्मगुरुचे काही अश्लिल फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त […]

Anto 22

Anto 22

मदुराईः तामिळनाडू राज्यात एका कॅथॉलिक धर्मगुरुने महिलांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात ही घटना घडलीय. या प्रकरणी आरोपी फादर बेनेडिक्ट अँटोविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला नागरकोइल येथील फॉर्महाउसमधून पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे.

या धर्मगुरुचे काही अश्लिल फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याचा मोबाइल फोन आणि लॅपटॉप हिसकावून घेतला होता. त्यानंतर नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली होती. पिलांकलाई येथील अवर लेडी ऑफ असम्पशन मलंकारा चर्चमधील धर्मगुरु तिचा ऑनलाइन छळ करत होता. ही विद्यार्थिनी जेव्हा चर्चला जायची तेव्हा अँटो हा तिच्याशी गैरवर्तन करायचा. या विद्यार्थीनीच्या आईकडून तिचा मोबाइल क्रमांक अँटोने मिळविला होता. विद्यार्थिनीचा व्हिडिओ कॉल आणि व्हॉटसअॅप चॅटद्वारे लैंगिक छळ सुरू केला. या प्रकरणी विद्यार्थीनीने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धर्मगुरु, त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने मुलीला धमकावले होते, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

Amritpal Singh Location : अमृतपाल नेमकं कुठं? विविध प्रकारच्या माहितीमुळे पोलिसांची दमछाक

मुलीच्या तक्रारी आधारे नागरकोईल सायबर पोलिसांनी अँटोविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर धर्मगुरु हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. हा धर्मगुरु हा एका फॉर्महाऊसमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणहून आरोपीला तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या आरोपीचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात ८०हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात काही अल्पवयीन मुलींचे फोटो आहेत. त्यामुळे पॉस्को कायद्यानुसार धर्मगुरुविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Exit mobile version