मोस्ट वॉन्टेड अमृतपाल सिंगला बेड्या, दुबईला पळून जाण्याच्या होता डाव

Amritpal Singh : एनआयएने अटारी सीमेवरून ड्रग्ज माफिया फरार आरोपी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला अटक केली आहे. आरोपी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. एप्रिल 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानमधून 102 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात तो फरार होता. या प्रकरणात अटक झालेला तो तिसरा व्यक्ती आहे. NIA arrests key absconding accused, […]

Amritpal Singh

Amritpal Singh

Amritpal Singh : एनआयएने अटारी सीमेवरून ड्रग्ज माफिया फरार आरोपी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला अटक केली आहे. आरोपी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे.

एप्रिल 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानमधून 102 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात तो फरार होता. या प्रकरणात अटक झालेला तो तिसरा व्यक्ती आहे.

हे प्रकरण एकूण 102.784 किलो हेरॉईनच्या जप्तीशी संबंधित आहे. याची किंमत अंदाजे 700 कोटी रुपये आहे. 24 आणि 26 एप्रिल 2022 रोजी भारतीय सीमाशुल्काने दोनदा जप्ती केली होती. अमृतसरच्या अटारी येथील एकात्मिक चेक पोस्टद्वारे अफगाणिस्तानातून ड्रग्ज भारतात आणले जात होते.

अमृतपालला 12 डिसेंबर रोजी अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. अमृतपालविरुद्ध जारी केलेल्या लुक आऊट परिपत्रकाच्या आधारे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

Exit mobile version