MP Election : भाजपशासित मध्य प्रदेशात निवडणुकीचे (MP Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. राज्यात याच वर्षातील डिसेंबर महिन्यात निवडणुकी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपने आश्वासनांचा पाऊसच पाडला आहे.
दीनदयाल रसोई योजनेच्या माध्यमातून गरजूंना फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी आज राजधानी भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे कन्वेंशन हॉलमध्ये 66 रसोई केंद्रांचे उद्घाटन केले. यावेळी चौहान यांनी ही घोषणा केली. याआधी 10 रुपयांत जेवण मिळत होतं पण आता 5 रुपयांतच जेवण मिळेल असे मुख्यमंत्री चौहान म्हणाले.
Naresh Goyal : उधार पैशांवर उभ्या राहिलेल्या सर्वात मोठ्या एअर कंपनीचे विमान जमिनीवर कसे आले?
राज्याच्या नागरी भागातल घरे नसलेल्या नागरिकांना 38 हजार 505 घरे देण्यात येतील. ज्या लोकांना पंतप्रधान आवास योजनेत घरे मिळाली नाहीत त्यांना सीएम आवास योजनेत घरे दिली जातील. दीनदयाल रसोई योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 66 नगरपालिकांमध्ये स्थायी रसोई केंद्र सुरू केली आहेत. याठिकाणी फक्त पाच रुपयांत जेवण मिळेल, असे चौहान यांनी सांगितले. आगामी निवडणूक (MP Election) डोळ्यांसमोर ठेऊन ही घोषणा करण्यात आल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
दरम्यान, यंदा विधानसभा निवडणूक (MP Election) भाजपसाठी (BJP) सोपी नाही. इंडिया आघाडीने (INDIA Alliance) जबरदस्त आव्हान उभे केले आहे. सरकारविरोधी वातावरणही राज्यात जाणवत आहे. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याऐवजी मुख्यमंत्री पदासाठी दुसरा उमेदवार असेल अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेससाठी (Congress) वातावरण अनुकूल असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपसाठी आव्हानाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
INDIA Alliance : आम्हाला घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे भाजपच घमेंडी; पवारांचं टीकास्त्र
दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीही (AAP) निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. जर या निवडणुकीत (MP Election) आपने एन्ट्री घेतली तर मात्र काँग्रेससाठी अडचण होऊ शकते. कारण, यामुळे काँग्रेसच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता आहे. देशात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका शक्यतो एकत्रित लढू यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र यानंतरही जर आम आदमी पार्टी निवडणूक रिंगणात उतरली तर काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत राज्यातील सर्वच जागांवर उमेदवार देण्याचे नियोजन पक्षाकडून केले जात आहे.