Download App

रोड शो अन् सभा गाजल्या! लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये ‘मोदी फॅक्टर’ ठरला गेमचेंजर

  • Written By: Last Updated:

Assembly Election Result : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या असून, चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपनं जवळपास विजय मिळवला आहे. लोकसभेपूर्वी सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा मोदी फॅक्टरने (Modi Factor) महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानापूर्वी मोदींनी तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आक्रमक भाषणं देत सभा गाजवल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याऐवजी भाजपने संपूर्ण निवडणूक पीएम मोदींच्या चेहऱ्यावर लढवली आणि लोकांना कमळावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम तीन राज्यातील निकालात दिसून येत आहे. (BJP Win In Three State Modi Factor Give Power To BJP)

Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं

राजस्थानमध्ये 12 रॅली अन् विजयाची हमी

राजस्थानमध्ये प्रचारादरम्यान मोदींनी 12 सभांना संबोधित केले. तसेच जयपूर आणि बिकानेरमध्ये दोन रोड शो केले. राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी अशोक गेहलोत यांच्यावर भ्रष्टाचारापासून कन्हैयालाल हत्याकांडापर्यंतचे मुद्दे उपस्थित केले. मतदारांनी या ठिकाणी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या भरघोस घोषणांऐवजी मोदींनी दिलेली विययाची हमी अधिक भावली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गेहलोत पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही, अशी भविष्यवाणी केली होती.

मध्य प्रदेशात 14 जाहीर सभा

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात एकूण 14 जाहीर सभा घेतल्या. 230 विधानसभेच्या जागांसाठी मोदींनी मध्य प्रदेशातील रतलाम, सिवनी, खंडवा, सिधी, दमोह, गुना, मुरैना, सतना, छतरपूर, नीमच, बरवानी, बैतुल, शाजापूर आणि झाबुआ येथे सभांना संबोधित केले. यासोबतच मोदींनी इंदूरमध्ये रोड शोही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवराज सरकारच्या अँटी इन्कम्बन्सीला निवडणुकीत वरचढ होऊ दिले नाही, तसेच काँग्रेसला त्याचा फायदा उठवण्याची संधीही दिली नाही.

‘BRS’ची मोटार तेलंगणातच रुतली; आता महाराष्ट्रात भालके, धोंडगे, शेलार, राठोडांचे काय होणार?

छत्तीसगडमध्येही मोदींची जादू

चार राज्यांच्या निकालामध्ये सर्वात मोठी उलटफेर छत्तीसगडमध्ये बघायला मिळत असून, काँग्रेसला पूर्णपणे पिछाडीवर टाकत भाजपमध्ये येथे सत्ता स्थापननेकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे येथे देखील भाजपसाठी मोदी फॅक्टर लकी ठरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये पहिली सभा घेतली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे भाजपने येथेदेखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाहीये. पीएम मोदींनी दुर्ग, विश्रामपूर, मुंगेली आणि महासमुंद भागात सभा घेत यात महादेव अॅप, राज्यातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला होता.

तेलंगणात भाजपची चांगली कामगिरी

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक लक्ष तेलंगणावर होते. या ठिकाणी मोदींच्या 8 सभा आणि रोड शो पार पडला होता. विजयासाठी भाजपकडून या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, येथे भाजपला हवे तसे यश जरी मिळालेले नसले तरी, मागच्या निवडणुकांपेक्षा भाजपनं येथे अधिकच्या जागांवर आघाडी घेतली आहे.

Tags

follow us