Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं

  • Written By: Published:
Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं

Five Big Reasons Behind Victory In Rajasthan Election : लोकसभा निवडणुकांपूर्वी सेमीफायन म्हणू बघितल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Election) राजस्थानमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाले आहे. या विययानंतर राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली सत्ता बदलाची परंपरा यावेळीही बदललेली नाहीये. काँग्रेसच्या हातून सत्ता काबीज करत आता राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या मार्गावर असून, काँग्रेसच्या या पराभवामुळे राजस्थानात गेहलोतांची जादू फिकी पडल्याचे चित्र साफ झाले आहे. तर, भाजपच्या दणदणीत विजयामागे पाच कारणं कारणीभूत ठरली आहेत.

Election Results 2023 : PM मोदींशिवाय पर्याय नाहीच! अजितदादांनी पहिली प्रतिक्रिया..

मोदींच्या जादू पुढे अशोक गेहलोत पडले फिके

विधानसभेतील मतदानापूर्वी करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान राजस्थानमध्ये भाजपने पंतप्रधान मोदींचा चेहरा समोर केला. भाजपने या ठिकाणी केवळ मोदींच्या चेहऱ्याचा वापर केला. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली नाही. पंतप्रधानांनी स्वतः 15 सभा घेतल्या. याशिवाय बिकानेर आणि जयपूरमध्ये रोड शोही केले. प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी गेहलोत सरकारवर भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे आरोप करत घेरले होते.

भाजपने पुन्हा खेळले हिंदुत्वाचे कार्ड

विधानसभेच्या 200 जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही. 2018 च्या निवडणुकीत भाजपने टोंकमधून सचिन पायलट यांच्या विरोधात युनूस खान यांना उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. मुस्लिमबहुल तीन जागांवर भाजपने संतांना उमेदवारी दिली. जयपूरच्या हवा महल मतदारसंघातून संत बाल मुकुंद आचार्य यांना तिकीट दिले, तर अलवरच्या तिजारा मतदारसंघातून बाबा बालकनाथ यांच्यावर दाव लावला. बालकनाथ स्वत:ला राजस्थानचे योगी म्हणतात. त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे सीएम योगीही तिजारा येथे पोहोचले होते.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचे भाजपकडून भांडवल

राजस्थान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा ठासून मांडत याचे भांडवल केले. जून 2022 मध्ये झालेल्या या हत्याकांडाच्या निमित्ताने भाजपने येथे पुन्हा जातीय कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका रॅलीत कन्हैया लालच्या हत्येचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, काँग्रेस राजस्थानची परंपरा धोक्यात आणत आहे. काँग्रेसच्या राजवटीत कॅमेऱ्यांसमोर जे काही घडले, त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही, हा खून काँग्रेस सरकारवर मोठा डाग असल्याचे मोदी म्हणाले होते.

पेपरफुटीचा मुद्दा बनवून भाजपने काँग्रेसला पकडले कोंडीत

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचं भांडवलं करण्याबरोबरच भाजपनं राजस्थानमध्ये पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला कोंडीत पकडले. याच मुद्द्यावरून सचिन पायलट यांनीदेखील निवडणुकीपूर्वी आपल्याच सरकारला कोंडीत पकडत पेपरफुटीच्या चौकशीची मागणी केली होती.

Telangana Election Result : ABVP तून सुरुवात, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, CM पदाचा चेहरा रेवंत रेड्डी नेमके कोण?

लाल डायरीवरून काँग्रेसला घेरले

भाजपने या निवडणुकीत लाल डायरीलाही मोठा मुद्दा बनवला. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना खुद्द पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवडणूक सभांमध्ये लाल डायरीचा उल्लेख केला होता. जुलै महिन्यात अशोक गेहलोत सरकारचे बरखास्त मंत्री राजेंद्र गुधा लाल डायरी घेऊन विधानसभेत पोहोचले होते. येथे त्यांनी गेहलोत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर भाजपला एक मोठा मुद्दा मिळाला आणि त्यांनी त्याचे भांडवल निवडणुकीत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube