Download App

MPhil ची पदवी अवैध; अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नका; अ‍ॅडमिशन थांबवण्याचे UGC चे निर्देश

  • Written By: Last Updated:

UGC Discontinues M.Phil Degree :  विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने MPhil हा शैक्षणिक प्रोग्रॅम बंद केला असून, येथून पुढे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री कायमची बंद होणार आहे. जी विद्यापीठे ही पदवी देतील ती डिग्री अवैध असेल असेही युजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्याने MPhil अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले आहे. याशिवाय यूजीसीकडून 2023-24 या सत्रातील MPhil अभ्याक्रमासाठी प्रवेश थांबण्यासाठी त्वरीत पावले उचलण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना यूजीसीकडून विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
मुळे .

विद्यार्थांना केले प्रवेश न घेण्याचे आवाहन 

या पदवीबाबत बोलताना युजीसीचे सचिवांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल अभ्यासक्रम बंद केला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पदवी आता मान्यताप्राप्त नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीने विद्यार्थांना केले आहे. अभ्यासक्रम बंद केल्यानंतरही काही विद्यापीठांकडून एम.फिल (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) प्रोग्रॅमसाठी नवीन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी एम.फिल अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही विद्यापीठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नोटीसमध्ये काय?

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये यूजीसी (पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया) विनियम 2022 च्या नियमन क्रमांक 14 वर जोर देण्यात आला आहे.ज्यात उच्च शैक्षणिक संस्थांना एमफिल प्रोग्राम ऑफर करण्यास प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक विद्यापीठे एमफिलसाठी अर्ज मागवत आहेत. ही बाब लक्षात घेत आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विद्यापीठांना शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी एमफिलसाठीचे प्रवेश थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे.

follow us