Mumbai-Delhi Flight price : हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचं पाहायाला मिळत आहे. त्यात घरगुती हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता मुंबईहून दिल्लीला हवाई मार्गे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. कारण आता मुंबई ते दिल्ली विमानप्रवास स्वस्त झाला आहे. ( Mumbai to Delhi Flight tickets rate reduced )
ठाणे महानगरपालिकेत 70 जागांसाठी भरती, थेट मुलाखत; 1 लाख 85 हजार रुपये महिन्याला पगार
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विमान प्रवासाच्या तिकीटामध्ये वाढ होते. कारण लोक सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी जात असतात. तर आता लोकांचा विमान प्रवास कमी झाल्याने तसेच हवामानामध्ये बदल झाल्याने विमान प्रवासावर परिणाम होतो त्यामुळे गेल्या 24 तासांत मुंबई ते दिल्ली विमानप्रवास निम्म्याहून कमी झाला आहे. हे भाडे आता 1400 रूपयांवरून थेट 4,500 रूपयांवर आले आहे.
हा विमान प्रवास अगोदर 19000 त्यानंतर 14000 तर आता थेट 4,500 रूपायांवर आला असला तर प्रवाशांची संख्या देखील दररोज 4 लाख एवढी आहे. दरम्यान मे महिन्यामध्ये गो फर्स्ट विमानसेवा बंद झाल्यानंतर विमान प्रवास महागला होता. मात्र आता यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईहून दिल्लीला हवाई मार्गे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे.
मात्र दुसरीकडे लेह आणि श्रीनगरच्या विमान प्रवासाच्या तिकीटामध्ये वाढ झालेली आहे. मे आणि जून महिन्यात हे भाडं सर्वात जास्त वाढलं होत. त्यावेळी दिल्ली ते लेह आताचे तिकिट 15000 हजार आहे. तर वाढले तेव्हा ते 23000 होते.