Download App

प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू, अचानक काय झालं?

एआर रहमान यांना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात नेलं. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. ईसीजी,

  • Written By: Last Updated:

Music Composer AR Rahman Health Deteriorates : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. छातीत दुखत असल्यानं एआर रहमान यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल केलंय. (Rahman ) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती समजते.

एआर रहमान यांना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात नेलं. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. ईसीजी, ईकोकार्डियोग्राम यासारख्या टेस्टही करण्यात आल्या. एआर रहमान नुकतेच परदेशातून परतले होते. त्यांना आधी मानेजवळ आणि नंतर छातीत वेदना होऊ लागल्या. त्रास वाढल्यानंतर त्यांना रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ठरलं तर! विधानपरिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर; कुणाला मिळालं तिकीट?

माहितीनुसार सुप्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांची प्रकृती स्थिर आहे. तसंच, काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, एआर रहमान यांना दुपारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. पण, अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, त्यांच्या प्रकृतीबाबतही अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

गायक एआर रहमान नुकतेच लंडनहून परतले आहेत. अशातच सध्या रमजानचा महिना सुरू असल्यामुळे त्यांचे रोजे सुरू आहेत. त्यामुळेच त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. अशा परिस्थितीत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

follow us

संबंधित बातम्या