Mythos AI: जगात सध्या एआय क्रांती (AI) होत आहे. एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगणं सोपं झालं असलं तरी काही संकटही निर्माण झाली आहेत. अमेरिकन कंपनी अँथ्रोपिकने ‘क्लाउड मिथोस’ (Mythos AI) नवीन एआय मॉडेल विकसित केलंय. पण मॉडेलमुळे जगभरातील बँकांना धोका निर्माण झालाय. या नवीन एआय मॉडेलने जागतिक बँकिंग सुरक्षेला मोठे आव्हान उभं केलंय. हे मॉडेल अवघ्या काही सेकंदात बँक खात्यांचे क्लिष्ट पासवर्ड आणि सुरक्षा प्रणाली भेदू शकते. हा धोका ओळखून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत तातडीची बैठक घेतलेय. या कंपन्यांनी बँक खातेही हॅकिंगबाबत सार्वजनिक माहिती दिली नाही. परंतु मिथोस एआय जगभरातील बँका सतर्क झाल्यात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली. त्यांनी देशातील प्रमुख बँकांचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. बँकांना कोणत्या धोक्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
धोका नेमका काय आहे ?
अँथ्रोपिक नावाची एक अमेरिकन एआय कंपनी आहे. तिने क्लाउड नावाचे एक एआय मॉडेल तयार केले. जे अनेक लोक वापरतात. याच कंपनी क्लाउड मिथोस नावाचे एक नवीन एआय मॉडेल तयार केले आहे. हॅकर्सच्या धोक्याला तोंड देण्यासाठी हे एआय मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. विशेषतः कंपन्या, बँका, सरकारी कार्यालयातील संगणक प्रणालींमध्ये घुसून हॅकर्स माहिती चोरतात. कोणाचे तरी खाते हॅक करतात आणि संगणकांमध्ये घुसखोरी करतात. ते अनेक कंपन्यांच्या वेबसाइट्स क्रॅश करतात, कधीकधी बँक खात्यांमधून पैसेही काढून घेतात. म्हणूनच प्रत्येकजण आपल्याला आपले पासवर्ड बदलत राहण्यास सांगत असतो. हॅकर्सपासून संरक्षण करण्यासाठी विविध सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध आहे.
क्लॉड मिथोसने जगाला का हादरवले ?
हॅकर्स हे कॅम्पट्युर सिस्टिम क्रॅक करून माहिती चोरतो. हॅकर्स पासवर्ड चोरून कॅम्प्ट्यूर सिस्टिममध्ये घुसतात. त्यासाठी हॅकर्सला अनेक दिवस लावतात. एआय हे काही मिनिटात करू शकतो. त्यामुळे एआय हे तुम्हाला सांगू शकते की हॅकर्स कुठून तुमची माहिती लिक करतो. त्यामुळे कंपन्या, बँका आणखी सुरक्षित यंत्रणा वापरेल. कंपनीने नवीन एआय मॉडेलची टेस्ट केली आहे. त्यात एआयने स्वॉफ्टवेअरमध्ये कुठे त्रुटी आहे हे सांगितले. त्यात वीस ते तीस वर्षे जुन्या त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानंतर कंपनी घाबरली त्यांनी क्लॉड मिथोस बाजारात आणणार नाही, अशी घोषणा केलीय. कारण ही कंपनीच घाबरली होती कारण कुठलीही माहिती एआय शोधून काढत होती. ही माहिती कुणाच्या हाती लागल्यास एखाद्या बँकेच्या सिस्टिममध्ये घुसून सर्व बँक अकाउंटमधील पैसे काढून घेतले असते. त्यासाठी कुठलाही पासवर्ड उपयोगी पडला नसता. पण एआयने चोरी सरू केली तर त्याला कोण रोखणार हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे हे एआय हॅकिंगची पद्धत स्वतःच तयार करू शकतो. टेस्टिंगची वेळी एआय मॉडेलने ब्राउजर आणि कॅम्प्ट्युर दोन्हीची सुरक्षा तोडली आहे. ही सुरक्षा तोडण्यासाठी 10 ते 15 वर्षांचा अनुभवी सायबर एक्सपर्ट हवा असतो. परंतु एआय मॉडेल हे सहजपणे केले आहे.
हे मॉडेल कुणाच्या हातात पडले तर ?
कंपनीच्या टेस्टिंगमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा वेळेस ही माहिती चुकीच्या व्यक्ती हाती गेल्यास प्रचंड गोंधळ उडेल. हा एआय बँकेची प्रणाली, सरकारची प्रणाली, रुग्णालयाची प्रणाली, कंपनीची प्रणाली आणि अगदी लष्कराच्या संगणक नेटवर्कमध्येही सहजपणे घुसखोरी करू शकते. त्यातून क्षेपणास्त्रे, बॉम्ब, रणगाडे, विमाने आणि या सारख्या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकते. पूर्वी हॅकिंगसाठी तज्ज्ञ आणि अनेक वर्षांच्या तयारीची आवश्यकता होती. आता, क्लाउड मिथोस (Cloud Mythos) या एआय मॉडेलचा वापर करून कोणीही मोठे हल्ले करू शकतो. त्यामुळे, अँथ्रोपिकने (Anthropic) सांगितले की ते हे मॉडेल सार्वजनिकरित्या उपलब्ध करणार नाहीत. सध्या, त्यांनी हे मॉडेल केवळ ॲमेझॉन, ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन आणि क्राउडस्ट्राइक यांसारख्या विश्वासार्ह मोठ्या कंपन्यांना चाचणीसाठी दिले आहे. त्यावर विविध मर्यादा घातल्या आहेत. ते याचा वापर त्यांच्या संगणक प्रणाली सुरक्षित करण्यासाठी करतील. हे मॉडेल कमकुवत जागा शोधून त्या दुरुस्त करेल आणि हॅकर्सना त्यांच्या नेटवर्कवर हल्ला करण्यापासून रोखेल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर कंपनी हे मॉडेल मोफत देत नसेल, तर यात धोका काय आहे? मग सरकारे यासाठी सज्ज का होत आहेत? कारण ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, काही लोकांनी कदाचित आधीच ‘क्लाउड मिथॉस’ आत्मसात केला आहे.
या अहवालामुळे जगभरात चिंतेची घंटा वाजली आहे. कल्पना करा, जर एखाद्या हॅकरने देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीमध्ये घुसखोरी केली तर काय होऊ शकते? जर ते सरकारी प्रणालीमध्ये किंवा अगदी लष्करी प्रणालीमध्ये घुसखोरी करू शकले तर? त्यामुळे, जगभरातील सरकारे आणि बँका सतर्क झाल्या आहेत. याबाबत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या, आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. तथापि, हे एआय मॉडेल चुकीच्या लोकांच्या हाती लागले आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. केवळ एक धोका आहे, आणि तो धोका आहे. अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. बँकांकडे लाखो लोकांचे पैसे, खाती आणि डेटा असतो. जर एखाद्या एआयने या प्रणाली हॅक केल्या तर काय होऊ शकते याची कल्पना करणे कठीण आहे. भारतातील बँकांना त्यांची सायबर सुरक्षा आणखी मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी सर्वोत्तम सायबर तज्ञांना कामाला लावून धोक्याची माहिती तात्काळ शेअर करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक माहिती मिळवण्यासाठी सरकारने अँथ्रोपिक कंपनीशी थेट संपर्क साधला आहे. याचा अर्थ असा की, जगात कुठेही असा हल्ला झालेला नाही आणि हे मॉडेल चुकीच्या लोकांच्या हाती लागले आहे की नाही हे माहीत नाही, परंतु धोका मोठा असल्याने दक्षता वाढली आहे. चोरांना पकडण्यासाठी प्रणाली तयार करण्याच्या प्रयत्नात, एआयने कदाचित जगातील सर्वात मोठा महाचोर तयार केला असेल. एक गोष्ट मात्र नक्की आहे.
