Download App

काहीच मोफत देऊ नका; 70 तास कामाच्या विधानानंतर नारायण मूर्तींच्या टार्गेटवर ‘फुकटे’ लोकं

  • Written By: Last Updated:

Narayan Murthy : सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती (Narayan Murthy) यांनी पुन्हा एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. ते म्हणाले की, राजकीय पक्षांकडून निवडणुक प्रचारात नागरिकांना विविध गोष्ट मोफत देण्याच्या घोषणा दिल्या जातात. मात्र कोणत्याही गोष्टी मोफत दिल्या जाऊ नयेत. माझा त्याला विरोध आहे. तसेच ते म्हणाले की, सबसिडी घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या विकासासाठी योगदान दिलं पाहिजे.

सबसिडी घेणाऱ्या लोकांनी…

सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती हे कर्नाटकातील बेंगळूरूमध्ये टेक समिट 2023 च्या 26 व्या सोहळ्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या विविध घोषणांवर आक्षेप घेतला. त्याचबरोबर जे लोक सरकारी योजनांचा लाभ घेतात. सबसिडी मिळवतात त्यांना देखील सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही पण मला असं वाटत की, मोफत सेवा घेणाऱ्या लोकांनी भावी पीढीसाठी देखील योगदान द्यावं.

भारतीयांना सातत्याने डिवचणारे अमेरिकेचे माजी मंत्री हेनरी किसिंजर यांचे निधन

पुढे आपल्या या विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, जर तुम्हाला राजकीय पक्ष मोफत वीज देण्याचं वचन देत आहेत. तर ती सरकारसाठी चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही त्यांनी यासाठी एक अट घातली पाहिजे. ती म्हणजे जर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 20 टक्के झाली तरच या सुविधा दिल्या जातील. त्यामुळे नागरिकांना मोफत सुविधा देखील मिळतील. तसेच भावी पीढीच्या शिक्षणामध्ये देखील योगदान दिलं जाईल.

Sanjay Raut : राज्यातले ‘सुलतान’, ‘डेप्युटी सुलतान’ प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबो

मी देखील गरिब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही पण मला असं वाटत की, मोफत सेवा घेणाऱ्या लोकांनी भावी पीढीसाठी देखील योगदान द्यावं. त्यांच्याकडून ते करून घेतलं जावं. कारण भारतासारख्या गरिब देशावला समृद्ध बनवण्यासाठी उदारमतवादी भांडवलशाही हा एकच पर्याय आहे. असं देखील यावेळी मूर्ती म्हणाले.

देशातील तरुण आठवड्यातून 70 तास काम करतील तेव्हाच…

दरम्यान या अगोदर मूर्ती यांनी असंच एक विधान केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली होती. ते म्हणाले होते की, देशातील बहुतांश सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये 8 ते 9 तास काम करण्याची संस्कृती आहे. देशातील तरुणांनी दररोज सुमारे 12 तास काम केले पाहिजे, जेणेकरून भारत वेगाने प्रगती करू शकेल. जेव्हा देशातील तरुण आठवड्यातून 70 तास काम करतील तेव्हाच भारत त्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करू शकणार असल्याचं ते म्हणाले होते.

Tags

follow us