भारतीयांना सातत्याने डिवचणारे अमेरिकेचे माजी मंत्री हेनरी किसिंजर यांचे निधन

  • Written By: Published:
भारतीयांना सातत्याने डिवचणारे अमेरिकेचे माजी मंत्री हेनरी किसिंजर यांचे निधन

Henry Kissinger : नेहमी भारतीयांबद्दल आणि वादग्रस्त भूमिका घेणारे अमेरिकाचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांचे कनेक्टिकट येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. हेनरी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारतीयांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे भारतीयांमध्ये त्यांची प्रतिमा फारशी चांगली नव्हती. किसिंजर हे 70 च्या दशकात अमेरिकन मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी प्रथम अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले आणि नंतर ते परराष्ट्र मंत्री झाले. (Ex US Secretary of State and Nobel Prize winner Henry Kissinger dies aged 100)

Tata Technologies IPO ची धमाकेदार एन्ट्री; लिस्टिंग होताच गुंतवणुकदारांचे पैसे झाले डबल

वाद आणि हेनरी

हेनरी किसिंजर यांचं संपूर्ण जीवन कायम चर्चेत राहिले कारण त्यांची भूमिका आणि विधान ही वादग्रस्त असतं. त्यामुळे ते आयुष्यभर वादांमुळे चर्चेत राहिले. किसिंजर यांनी 1971 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशच्या फाळणीवेळी झालेल्या नरसंहारात पाकिस्तानचे समर्थन केले होते. बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळे झाल्यानंतर इंदिरा गांधी निक्सन आणि किसिंजर यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी हेनरी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

वॉरन बफे यांना ‘सिगार बट’ची थ्योरी देणारा चार्ली गेला!

हेनरी किसिंजर यांचा जन्म 1923 मध्ये जर्मनीत झाला. नाझी जर्मनीच्या काळात त्यांचे कुटुंब 1938 मध्ये अमेरिकेत पळून गेले. किसिंजर 1943 मध्ये अमेरिकन नागरिक झाले. यानंतर, त्यांनी तीन वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा केली आणि नंतर ते काउंटर इंटेलिजन्स कॉर्प्समध्ये रुजू झाले. बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात इंटरनेशनल रिलेशन्सवर शिक्षण घेतले.

विद्यार्थी ते प्राध्यापक

जेव्हा किसिंजर अमेरिकेत आले तेव्हा ते किशोरवयीन होते. त्यांना इंग्रजीही फारशी येत नव्हती. मात्र, बुद्धिमत्ता, इतिहासावरील मजबूत पकड आणि लेखक असणाऱ्या हेनरी यांनी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थीदशेतून प्राध्यापक पद झोळीत टाकले. त्यानंतर त्यांनी 1969 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली.

Sanjay Raut : राज्यातले ‘सुलतान’, ‘डेप्युटी सुलतान’ प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

किसिंजर हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी एकाच वेळी राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केले. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांची पकड होती जी इतर कुणाकडे नव्हती. निक्सन प्रशासन आणि नंतर जेराल्ड फोर्ड प्रशासनात परराष्ट्र सचिव असताना हेनरी यांनी चीनवर लक्ष केंद्रितकरत राजकीय मैत्री जपण्यासाठई नेतृत्व केले.

व्हिएतनाम युद्ध संपवण्यासाठी पॅरिस शांतता करारातही किसिंजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तथापि, किसिंजर यांना मानवाधिकारांवर सोव्हिएत युनियनशी शत्रुत्वाला प्राधान्य देण्याचा आरोप करणार्‍यांकडून तीव्र टीकाही झाली. चिलीतील ऑगस्टो पिनोशेच्या राजवटींसह जगभरातील दडपशाही राजवटींचे समर्थन केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube