इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण हे कधीही वर्क फ्रॉम होमचे समर्थक राहिले नाहीत. पण आत त्यांनी मूनलाइटिंगचाही विरोध केला आहे. मूनलाइटिंग म्हणजे एकाच वेळी दोन नोकर् करणे. नारायण मूर्ती हे २३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ कार्यक्रमात ते वर्क कल्चर बद्दल बोलले. ते म्हणाले की आळसाला सामोरे जावे लागेल आणि भारतात प्रामाणिक कष्ट करणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे.
हेही वाचा : Letsupp Survey : 81 टक्के लोकांचे मत शिवसेना ठाकरेंचीच; शिंदेंसाठी धक्का
नारायण मूर्ती म्हणाले की, “मी मूनलाइटिंग करेन, मी वर्क फ्रॉम होम करेन, आठवड्यातील तीनच दिवस मी ऑफिसला येईल, तीन दिवस घरी राहून काम करीन. या सापळ्यामध्ये अडकू नका”
मागच्या काही काळात मूनलाइटिंगसारखे ट्रेंड चर्चेत होते. मूनलाइटिंग म्हणजे पूर्णवेळ नोकरीसह दुसरे काम करणे. भारतात विप्रोच्या रिषद प्रेमजी यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले होते. २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये मूनलाइटिंगला “फसवणूक” असं म्हटलं होतं. विप्रोने काही महिन्यापूर्वी मूनलाइटिंग करत असलेल्या ३०० कर्मचार्यांनाही काढून टाकले होते.
याच कार्यक्रमात त्यांनी आपला चीन मधील एक अनुभवही सांगितलं. २००६ मध्ये मूर्ती चीनमधील शांघाय दौर्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, शहराच्या महापौरांनी जागा निवडल्यानंतर एक दिवसातच निवडलेल्या २५ एकर जागेचे वाटप केले होते. ते पुढे म्हणाले की, खालच्या स्तरावर भ्रष्टाचारामुळे भारताकडे ही गती कमी आहे.