Download App

2024 ला मोदी विरुद्ध प्रियांका? ‘या’ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

  • Written By: Last Updated:

Priyanka Gandhi : मागील काही वर्षापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी राजकीय दृष्ट सक्रीय झाल्या आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, कर्नाटकमधील निवडणुकांची त्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले होते. आता त्या संसदीय राजकारणात येऊ शकतात. आतापर्यत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. सोनिया गांधी यांचे वय आणि आजारपण बघता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक त्या लढवू शकतात.

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी देखील एका मुलाखतीतून हे सूचित केले आहे आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, प्रियंका गांधींमध्ये संसदेत जाण्याचे सर्व गुण आहेत. मला वाटते तिने संसदेत असावे. लोकसभेत नक्कीच चांगले काम करेल.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की प्रियांकामध्ये एका संसद सदस्यांचे सर्व गुण आहेत. लोकसभेत पोहचली तर उत्तम कामगिरी करेल. ती खासदार झाली तर मलाही आनंदच आहे. ते पुढं म्हणाले की मला आशा आहे की काँग्रेस पक्ष त्यांचं नेतृत्व स्विकारेल आणि तिच्यासाठी चांगली संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले.

फ्लॉप शोनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलचं वर्चस्व कायम; विराटलाही टाकलंय मागं…

भाजपला प्रत्युत्तर
रॉबर्ट वाड्रा यांनी संसदेत त्यांचे छायाचित्र दाखविल्याबद्दल भाजपवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही गौतम अदानी यांच्यासोबत विमानात बसलेले अनेक फोटो आहेत. यावर आम्ही अनेकवेळा प्रश्न केला आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत अनेक प्रश्न विचारले आहेत, मात्र ते त्यांची उत्तरे देत नाहीत.

ते पुढं म्हणाले, माझ्या नावासाठी मी लढत राहीन. जर त्यांनी माझे नाव घेतले तर मी त्यांना प्रश्न विचारत राहील. त्यासाठी त्यांना पुरावे द्यावे लागतील. तसे झाले नाही तर त्यांना माफी मागावी लागेल.

Dilip Valase Patil : मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं; ‘त्या’ चर्चांना वळसे पाटालांचा दुजोरा

स्मृती इराणी यांनी फोटो दाखवला
लोकसभेत अविश्वास प्रस्तावादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रॉबर्ट वाड्रा यांचा फोटो दाखवला. स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, “हे कधीपासून अदानी अदानी करत आहेत, मीही आता थोडं बोलायला हवं की माझ्याकडेही फोटो आहे. अदानी एवढा वाईट असेल तर मेहुणा (रॉबर्ट वाड्रा) त्यांच्यासोबत काय करतोय?”

वाड्रा यांनी इराणी स्मृतींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, “मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. महिला आणि बाल विकास खातं सांभाळणाऱ्या मंत्री माझे नाव घेत आहेत. मी संसदेचा सदस्यही नाही.”

Tags

follow us