फ्लॉप शोनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलचं वर्चस्व कायम; विराटलाही टाकलंय मागं…

फ्लॉप शोनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलचं वर्चस्व कायम; विराटलाही टाकलंय मागं…

Shubhaman Gill : इंडियन क्रिकेट टिमचा स्टार फलंदाज शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तिन्ही फॉर फॉरमॅटमध्ये टीमसाठी चांगला असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना त्याला चांगलाच संघर्ष करावा लागल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही गिल फ्लॉप ठरला. असं असलं तरी देखील गिल 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे.(indian cricketer shubman gill top run scorer in international cricket in 2023 virat kohli )

Dilip Valase Patil : मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं; ‘त्या’ चर्चांना वळसे पाटालांचा दुजोरा

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत गिलने 85 धावांची खेळी केली. याआधी तो कसोटी मालिकेत विशेष काही करु शकला नाही. त्याचवेळी गिल टी-20 मालिकेतील तीन सामन्यांमध्येही अपयशी ठरला आहे. मात्र तरीही तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

दर्शन झालं सोपं! त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून व्हीआयपी दर्शन बंद, ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय

2023 मध्ये, गिलने आत्तापर्यंत 26 सामन्यांच्या 29 डावांमध्ये फलंदाजी करताना 46.07 च्या सरासरीने 1198 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 5 शतकं आणि 2 अर्धशतकं केली आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे.

या यादीत आयर्लंडचा हॅरी टेक्टर 30 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 42.48 च्या सरासरीने 1147 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेक्टरने या कालावधीत 2 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत. या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली सध्या 7 व्या क्रमांकावर आहे.

कोहलीने 2023 मध्ये 17 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 54.66 च्या सरासरीने 984 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 4 शतकं आणि 2 अर्धशतकं केली आहेत, त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 186 धावा आहे.

2023 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू
1- शुभमन गिल (भारत) – 1198 धावा
2- हॅरी टेक्टर (आयर्लंड) – 1147 धावा
3- कुसल मेंडिस (श्रीलंका) – 1126 धावा
4- दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) – 1089 धावा
5- डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) – 1043 धावा
6- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) – 1037 धावा
7- विराट कोहली (भारत) – 984 धावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube