Download App

अदानींना सिमेंट उद्योगाचा आधार; कर्जाचा विळखा सोडविण्यासाठी ‘या’ कंपनीतील हिस्सा विकणार

Adani Group : हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर गौतम अदानींच्या (Gautam Adani) उद्योग विश्वातील साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे आतापर्यंत 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि कंपनीची विश्वासार्हता कायम करण्यासाठी अदानी समूहाने काही महत्वाची पावले उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार अदानी समूह सिमेंट उद्योगातील चार ते पाच टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

वाचा :Sanjay Raut : मोदी शाहांच्या मदतीने देश लुटणाऱ्या अदानींना साधी नोटीसही नाही; राऊतांचा हल्लाबोल 

फायनान्सिअल टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की अदानी समूह अंबुजा सिमेंट उद्योगातील 4 ते 5 टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारी करत आहे. कर्ज कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्याच्या उद्देशाने ते हे करत असल्याची चर्चा आहे. ही हिस्सेदारी विकून जवळपास 450 दशलक्ष डॉलर्स निधी उभा करण्याची कंपनीची योजना आहे.

तीन लोकांना ही योजना माहिती असून त्या तीन लोकांनी सांगितले की अदानी यांनी इंटरनेशनल लेंडर्सना विनंती करत म्हटले की ते अंबुजा सिमेंटमधील चार ते पाच टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत आहेत. अदानी यांच्याकडे अंबुजा सिमेंटची 63 टक्के हिस्सेदारी अजूनही आहे.

अदानी ग्रुपमधील ही गुंतवणूक नक्की कोणाची?

हिस्सेदारी कोण खरेदी करणार हे सांगितले नाही. या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या चौथ्या व्यक्तीने यास दुजोरा दिला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यापासून अदानींच्या मार्केट कॅपमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर ते काही मार्ग वापरत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी. कंपनीची विश्वासार्हता कायम करण्यासाठी हे मार्ग वापरले जात आहे. दरम्यान, याबाबत अदानी समूनहाने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

Tags

follow us