Download App

राहुल गांधींनी घेतली पत्रकाराची फिरकी; म्हणाले, देखो हवा निकल गई..

Rahul Gandhi : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका तर केलीच त्याचवेळी एका पत्रकाराचीही चांगलीच फिरकी घेतली.

वाचा : अपात्र ठरवा, तुरुंगात टाका प्रश्न विचारणारचं; पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा रूद्रावतार

त्याचे झाले असे, राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. त्याचवेळी त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला.

आता जो निकाल आला आहे. त्यानंतर भाजपने असे म्हटले आहे की राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला आहे. त्यामुळे भाजप आता देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे, असा प्रश्न या पत्रकाराने राहुल गांधींना विचारला.

त्यावर राहुल म्हणाले, तुम्ही इतके थेटपणे भाजपसाठी कशाला काम करताय ? थोडी चर्चा करून विचार करून करा ना. थोडे फिरून मला प्रश्न विचारा असे त्यांनी  म्हटले. तसेच त्यांनी पत्रकाराच्या चेहऱ्यावरील हावभावही सांगितले. ते म्हणाले, बघा आता तुम्ही हसत आहात. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर खरचं भाजपसाठी काम करायचे असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या छातीवर भारतीय जनता पार्टीचा झेंड लावून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला काय ती उत्तरे देईल. पत्रकार बनण्याचे नाटक आजिबात करू नका.

त्यानंतर राहुल गांधी यांनी संबंधित पत्रकाराकडे पाहत हवा निकल गई असे म्हटले. त्यानंतर येथे उपस्थितांत चांगलाच हशा पिकला.

Tags

follow us