Download App

Video : मणिपुरात भारतमातेची हत्या, संसदेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल

Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ सुरू झाला. भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

या गदारोळात राहुल गांधी बोलत राहिले. ते म्हणाले, मणिपूरमध्ये भाजपच्या राजकारणाने भारताची हत्या केली आहे, त्यांनी भारताची हत्या केली आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. राहुल गांधींच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारच्यावतीने उभे राहत या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मणिपूरमध्ये सरकारने भारताचा आवाज मारला म्हणजे भारत मातेची हत्या केली असून, तुम्ही देशद्रोही आहात, मणिपूरमध्ये तुम्ही देशाचा खून केला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला.

मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो, मात्र पंतप्रधान अजून गेलेले नाहीत. मणिपूर हा पंतप्रधानांसाठी भारत नाही, आज मणिपूरचे दोन भाग झाले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमधील एका महिलेने मला सांगितले की, तिच्या एकुलत्या एका मुलाला गोळी मारण्यात आली आहे, मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ राहिले. जेव्हा ती महिला तिच्या त्रासाची माहिती देत ​​होती तेव्हा ती बोलत असताना बेशुद्ध पडली, अशा घटना राहुल गांधींनी सांगितल्या.

मी अदानींवर बोलणार नाही घाबरू नका

संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आजाचा दुसरा दिवस असून, राहुल गांधी संसदेत बोलत आहेत. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस त्यांचे लोकसभा खासदारकीचे सदस्यत्व पुन्हा बहाल केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच आज मला मनापासून बोलायचे असून, काही गोळे फेकणार आहे पण अदानींवर बोलणार नाहीये, त्यामुळे भाजपच्या माझ्या मित्रांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही.

मणिपूरवरून हल्लाबोल

यावेळी राहुल गांधींनी मणिपूर मुद्द्यावरून भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी अद्याप मणिपूरचा दौरा केलेला नाही. त्यांच्यासाठी हा भारताचा भाग नसून मणिपूर दोन भागांत विभागले गेल्याचे ते म्हणाले. भाषण संपल्यानंतर मात्र राहुल गांधी सभागृहात थांबले नाहीत.

Tags

follow us