Download App

राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP दौरा रद्द, रांचीलाही रॅलीसाठी जाणार नाही

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रांची येथे आयोजित इंडिया आघाडीच्या मेळाव्याला (INDIA Alliance) उपस्थित राहणार नाहीत. मध्य प्रदेशातील सतना येथे होणारी सभाही राहुल गांधींच्या अनुपस्थितीतच होईल. राहुल गांधी यांचा मध्य प्रदेश दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. राहुल गांधी आज सतना आणि रांची येथे सभांसाठी जाणार होते. परंतु, अचानक त्यांची तब्बेत खराब झाली. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सभेला संबोधित करत आहेत.

झारखंडची राजधानी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी इंडिया आघाडीची ताकद दिसून येत आहे. रांची शहरातील प्रभात तारा मैदानावर होणाऱ्या या मेगा रॅलीला उलगुलान न्याय रॅली असे देण्यात आले आहे. या रॅलीत जवळपास 14 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सुनीता केजरीवाल, आप नेते संजय सिंह आदींसह विरोधी पक्षांतील अनेक नेते या रॅलीसाठी पोहोचले आहेत. या रॅलीत राहुल गांधी सुद्धा येणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रॅलीत सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले.

राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते देशभरात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. ते स्वतः केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आजही त्यांच्या सभा होत्या. परंतु,  आजारी असल्याने त्यांना या सभांना उपस्थित राहत आले नाही. सतना येथे आयोजित सभेसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पोहोचले आहेत.

Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार ? लंकेंची गुगली    

follow us