National Herald Case : ईडीकडून गांधी कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपन्यांची 752 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपासा प्रकरणी ईडीकडून ही कारावाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये गांधी कुटुंबियांच्या दिल्ली आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊस आणि लखनऊच्या नेहरु भवनाचा समावेश आहे.
Dhangar Reservation : ‘निवदेन घ्यायला कोणी आलंच नाही म्हणूनच..,; दगडफेक प्रकरणावर पडळकर बोलले
या प्रकरणामध्ये यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे वृत्तपत्र ऑपरेटर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणामध्ये फसवणूक, कट रचण्याच्या आरोपांचा समावेश आहे. केंद्रीय तपास एजन्सीनूसार वृत्तपत्र प्रकाशक असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) आणि होल्डिंग कंपनी यंग इंडियन यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत आदेश जारी निवेदनात म्हटले “AJL कडे दिल्ली, मुंबई आणि लखनौ सारख्या देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या स्थावर मालमत्तेच्या रूपात गुन्ह्यांचे पैसे असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांची किंमत ६६१.६९ कोटी रुपये आहे. यादरम्यान, यंग इंडियनकडे एजेएलच्या ‘इक्विटी शेअर्स’च्या रूपात 90.21 कोटी रुपयांची अपहाराची रक्कम आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने एजेएल आणि यंग इंडियन यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “ईडीने एजेएल मालमत्ता जप्त केल्याच्या बातम्या प्रत्येक राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीतील पराभवावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नसून कोणतीही मालमत्ता हस्तांतरण झाले नाही. कोणत्याही प्रकारे पैशांचा अपहार झालेला नाही, फसवणूक झाल्याचा दावा करणारी एकही तक्रारकर्ता नाही. निवडणुकीच्या तोंडावर लक्ष वळवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचंही मनू सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय?
स्वातंत्र्यपूर्व काळात नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची स्थापना झाली होती. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयातून नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी नवजीवन हे हिंदी व कौमी आवाज हे उर्दू दैनिक प्रसिद्ध होत असे. त्यांचा काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असूनही संपादक एम. चलपती राव यांनी आपला स्वतंत्र बाणा जोपासला होता.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी असताना काँग्रेस पक्षाचा पैसा नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करणारी कंपनी विकत घेण्यासाठी वापरला असा दोघांवरही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपचे नेते सुब्रह्मण्याम स्वामी यांनी पहिल्यांदा 2012 मध्ये आरोप केले होते. तर गांधी कुटुंबियांनी कायम कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अफरातफरीचे आरोप फेटाळले आहेत.
AJL या कंपनीची एकूण मालमत्ता जी तेव्हा 20 अब्ज म्हणजे 2000 कोटी रुपयांच्या घरात होती ती हस्तगत करण्यासाठी सोनिया आणि राहुल यांनी काँग्रेस पक्षाचे पैसे वापरले असा आरोप सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला. त्याचीच ईडीकडून चौकशी सुरू आहे. राहुल आणि सोनिया यांच्याबरोबरच तेव्हाचे काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिझ, मोतीलाल व्होरा, राजीव गांधींचे मित्र सॅम पित्रोडा यांचाही यंग इंडियामध्ये वाटा होता. मालमत्ता हडप करण्यासाठी खोटे व्यवहार करून त्यासाठी पैशाची अफरातफर केल्याचा आरोपही केला गेला. चौकशी दरम्यान मनी लाँडरिंगचा गुन्हाही त्यात जोडला गेला. आणि त्यामुळेच सक्तवसुली संचालनालयाकडून ही चौकशी सुरू आहे.