Download App

मणिपूर पेटले! जागोजागी हिंसाचाराच्या घटना, राज्यभरात इंटरनेट ठप्प

Manipur Violence : मणिपूर राज्यात सध्या हिसेंचा आगडोंब उसळला आहे. राज्यात मेईतेई समाजाला अनुसूचित जनजातीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणी प्रश्नी ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. मेईतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात येथील स्थानिक जनजातीय समूहांद्वारे विरोध प्रदर्शने सुरू आहेत.

विरोध इतका वाढत चालला आहे की आता राज्यातील 8 जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

वातावरण अधिक चिघळू नये यासाठी सेना आणि अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात आले आहे. ऑल ट्राइबल स्टुडेंट युनियन मणिपूर (एटीएसयूएम) संघटनेने काढलेल्या आदिवासी एकजूटता मार्चमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. त्यानंतर चुराचांदपूर जिल्ह्यातील तोरबुंग परिसरात हिंसेच्या घटना घडल्या.

Patna High Court : नितीश कुमार सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका! जातनिहाय जनगणनेला अंतरिम स्थगिती

राज्यातील वातावरण चिघळत चालल्याचे पाहून राज्य सरकारने पाच दिवसांसाठी मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. मोठ्या सभांवर बंदी तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे.

काय आहे प्रकरण ?

हे सगळे प्रकरण राज्यातील मेईतेई या समुदायाशी निगडीत आहे. या समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी रॅली काढण्याची तयारी करण्यात आली. ऑल ट्राइबल स्टुडेंट्स युनियनने (ATSU) रॅली काढण्याची घोषणा केली होती. अशा पद्धतीने राज्यात विरोधाला सुरुवात झाली.

विरोध प्रदर्शन दरम्यान चुराचांदपूर जिल्ह्यात हिंसा भडकली. तोरबंगमध्ये आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्यात संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. जाळपोळ झाली. या हिंसक घटनांमुळे लोकांना त्यांची घरे सोडून जाणे भाग पडले आहे. इंफाळ पश्चिम, जिरिबाम, थौबल, काकचिंग, विष्णूपूर, चुराचांदपूर, तेंगनौपाल, कांगपोकपी जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Army Helicopter Crash: भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळलं

मेईतेई समुदाय मणिपूरमधील पहाडी भागातील जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सुमदायाकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. या समुदायात जास्त हिंदू आहेत आणि ते आदिवासी परंपरांचे पालन करतात. समुदायाचा दावा आहे की बांग्लादेशमधून घुसखोरीच्या घटना वाढत आहेत. ज्याचा आता स्पष्ट परिणाम जाणवत आहे.

Tags

follow us