Download App

कर्नाटक ‘डेंग्यू’ने फणफणले! सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; कठोर कारवाईचाही इशारा

कर्नाटकात डेंग्यू आजाराचा फैलाव मोठ्या (Karnataka News) प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

Karnataka Dengue Cases : कर्नाटकात डेंग्यू आजाराचा फैलाव मोठ्या (Karnataka News) प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत डासांमुळे होणाऱ्या (Dengue Cases) आजारांत वाढ झाली आहे. त्यात डेंग्यू या घातक आजाराचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहे. राज्यातील या आजाराची परिस्थिती पाहता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने डेंग्यूला महामारी रोग घोषित केले आहे. यांसह सरकारने कठोर नियम केले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा असे आदेश स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहेत.

या दिवसांत डासांची उत्पत्ती कमी होईल यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये कुचराई करणाऱ्यांवरही कारवाईचा (CM Siddaramaiah) इशारा सरकारने दिला आहे. रुग्णालयांनी डेंग्यू रुग्णांसाठी व्यवस्था करावी. आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधनन करावे अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. डेंग्यू अळ्यांना ओळखण्याचे आणि त्यांची पैदास रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवा असेही आदेश देण्यात आले आहेत.

यंदा जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या काळात सात हजारांहून आधिक रुग्ण आढळले आहेत. सात जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. हा धोका पाहूनच सरकारने या आजाराला महासाथ आजार म्हणून घोषित केले आहे. आता प्रत्येक दवाखान्यात प्रति वॉर्ड दहा खाटा राखीव ठेवण्यात येतील असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे.

Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या नव्या दाव्याने खळबळ!

तर होईल दोन हजारांचा दंड

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील घरांसाठी 400 आणि 200 रुपये दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. वाणिज्यिक कामकाजासाठी शहरी भागात एक हजार रुपये आणि ग्रामीण भागात दंडाची रक्कम पाचशे रुपये निश्चित करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती होईल अशी ठिकाणे आढळून आल्यास संबंधित जागा मालकांवर दोन हजार रुपये दंड लावण्यात येईल ग्रामीण भागात दंडाची रक्कम एक हजार रुपये निश्चित करण्यात आली आहेत.

 

follow us