Download App

Karnataka Polls : ठाकरे गटही कर्नाटकच्या मैदानात ?; निवडणूक लढण्याच्या हालचाली

Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.

Karnataka Election : भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर; फडणवीस गेमचेंजर ठरणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण झाली आहे. यासंबंधीची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत. एकीकरण समितीच्या आड कोणीही येऊ नये. संघर्ष कोणी जिवंत ठेवला. लढाया लढवल्या पाहिजे. उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असे सावंत म्हणाले.

Nitin Deshmukh : राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे नाहीतर फडणवीसच चालवतात…

कर्नाटकात 10 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता एकूण 5 हजार 102 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकतो.

दरम्यान, दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे असल्याचे म्हटले होते.

जर एखाद्या मंत्र्याचीच संपत्ती इतकी अफाट असेल तर या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती असेल, असा प्रश्न पडला असेल. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर केली आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यंदा म्हैसूर प्रदेशातील वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांनी शपथपत्रात आपली एकूण संपत्ती 19.01 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 9.43 कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्यावर 6.84 कोटींचे दायित्व आहे.

Tags

follow us