पंजाब राज्यातील लुधियाना शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी वायूची गळती होऊन नऊ लोकांचा मृत्यू झाला तर 11 जण बेशुद्ध झाले आहेत. ही घटना शहरातील ग्यासपूर परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी आली. नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Punjab: Gas leak at Ludhiana factory, 9 killed, 11 injured
Read @ANI Story | https://t.co/jShdIryPh7#Ludhiana #Gasleak #Punjab pic.twitter.com/KW5i4fTFJD
— ANI Digital (@ani_digital) April 30, 2023
या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक गॅस लीक झाल्याने पळापळ झाली. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती येथे निर्माण झाली होती. हा गॅस जवळच्याच फॅक्टरीमधून लीक झाली, असा दावा येथील नागरिकांनी केला. या कारखान्यापासून आता लोक दूर गेले आहेत.
या वायूगळतीमुळे काही जण बेशुद्ध पडले आहेत. आजूबाजूच्या लोकांवरही याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी असलेल्या अंजनकुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले, की माझ्या काकांचे येथे मेडिकल दुकान आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडले आहे. दोन जणांचे मृतदेह अजूनही घरात पडून आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त दिसत आहे.