Fali S Nariman Passes Away : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन (Fali S Nariman) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात नरिमन देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लिजेंड या नावाने देखील ओळखले जाते. भारताच्या कायदा क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व यांनी वकिलीचा मोठा वारसा मागे ठेऊन या जगाचा निरोप घेतला.
नरिमन यांच्या कायदा क्षेत्रातील कारकिर्द 1950 मध्ये मुंबईतून सुरू झाली होती. 70 वर्षांपेक्षा जास्त काळात त्यांनी दिल्लीला जाण्याआधी मुंबई उच्च न्यायालयात कायद्याचा सराव करून मोठा नावलौकिक मिळवला. त्यांच्या कायदेशीर कौशल्यामुळे त्यांना 1961 मध्ये वरिष्ठ अधिवक्ता पदी काम करण्याची संधी मिळाली. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नरिमन यांनी दिल्लीत बदली होण्याआधी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. यानंतर सन 1972 मध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती दिली.
Rituraj Singh passed Away : अनुपमा फेम अभिनेते ऋतुराज सिंह कालवश; हृदय बंद पडल्याने निधन
इंदिरा गांधींनी 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तेव्हा नरिमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या काळात त्यांनी आपली खासगी प्रॅक्टिस सुरुच ठेवली होती. त्यांचा मुलगा रोहिंटन नरिमन नंतर भारताचे सॉलिसिटर जनरल आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) न्यायाधीश झाले. भारताच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा अतूट विश्वास होता.
त्यांनी 1994 पासून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे अध्यक्ष म्हणून काम केले. 1989 पासून इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटर्नल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे उपाध्यक्ष आहेत. 1995 ते 1997 या काळात जिनिव्हा येथील इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्टच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपदी भूषवले. नरिमन हे 1991 ते 2010 या काळात बार असोसिएशनचे अध्यक्षही होते. त्यांना जानेवारी 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन, ‘या’ कारणामुळे 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास